स्व.आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या निधनानंतर ही मा.चंद्रकांत (दादा) देशमुख हे सांगोला तालुक्याची उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडताना दिसून येत आहे.
मुबंई : सांगोला तालुका सहकारी दुध उत्पादक संघाचे सभासद शेकाप नेते मा.चंद्रकांत (दादा) देशमुख यांचे महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंदा) संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्रातील सर्व सहकारी दुध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दुध संघाच्या संचालक पदावर, राज्यातील दुध व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्वांची निवड होते. यावर्षी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांमधील विविध नेते स्पर्धेत होते.
विविध योजना राबविल्या मा.उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल दुग्ध विकास मंत्री व राज्यातील इतर नेत्यांनी दुरदृष्टीने ही निवड बिनविरोध केली. सलग दुसऱ्यांदा दुध संघाचे संचालक म्हणून काम करताना, त्यांनी दुग्ध व्यवसायात आधुनिकतेची कास धरीत, दुधवाढ योजना राबवली. मॉर्डन डेअरी फार्म, गाय पोळा, गायींसाठी आरोग्य शिबिरे, चारा व्यवस्थापन व स्वच्छता असेविविध उपक्रम राबविले. विविध उपपदार्थांचे दर्जेदार उत्पादन व विक्री यातून संघाचा लौकीक वाढविला आहे. या संघामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. शेतकऱ्यांना विश्वासाचा जोड धंदा मिळाला आहे. मा.चंद्रकांत (दादा) देशमुख यांची महानंदा संस्थेच्या संचालकपदी झाल्याने सोलापूर जिल्ह्यात व सांगोला तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. सांगोल्यात अभिनंदन या निवडीबद्दल तालुक्यातील दुध उत्पादकांसह सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.