१ हजार ३०० खेळाडुंचा सहभाग.
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
आदिवासी विकास प्रकल्पातील, प्रकल्प स्तरीय क्रीडास स्पर्धेचे बुधवारी खेळाडूंच्या उत्साहात उदघाटन सोहळा पार पडला. या प्रकल्प स्तरीय क्रीडास स्पर्धेत एकूण १ हजार ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला असून, या स्पर्धांचे उदघाटन, जिल्हा परिषद अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रकाश निकम यांच्या क्रीडास स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले.
सन- २०२२- २३ साठी जव्हार प्रकल्प स्तरीय क्रीडास स्पर्धेत, जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड असा चार तालुक्यांतील आश्रम शाळा आणि विनाअनुदानित आश्रम असा एकूण ३० आश्रम शाळांचे खेळाडूंनी भाग घेतला असून, एकूण १ हजार ३०० खेळाडूंचा सहभाग घेतला आहे. प्रकल्प स्तरीय क्रीडास स्पर्धेचे आयोजन जव्हार तालुक्यतील विनवळ आश्रम शाळेच्या मैदानावर क्रीडास स्पर्धांना सुरवात झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर आदिवासी विभागातील आश्रम शाळांच्या क्रीडास स्पर्धांचे आयोजन झाले आहे. यामुळे आश्रम शाळांतील मुलं, मुली, खेळाडूंनी मोठा सहभाग नोंदवत, भाग घेतला आहे.
जव्हार प्रकल्प स्तरीय क्रीडास स्पर्धेत कब्बडी, खो-खो, हँड बॉल, फूट बॉल, हॉली बॉल, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, भाला फेक, रिले, १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, १०००० मीटर धावणे, असे सांघिक आणि वैयक्तिक, खेळ खेळविले जाणार आहेत, त्यात लहान गट, आणि मध्यम गट मुले, मोठा गट, मुले मुली, असा तीन गटांत क्रीडास स्पर्धांना सुरवात झाली आहे. ह्या प्रकल्प स्तरीय क्रीडास स्पर्धा बुधवार ते शुक्रवारपर्यंत असे तीन दिवस स्पर्धा चालणार आहेत.
या प्रकल्प स्तरीय क्रीडास स्पर्धेचे आयोजन आदिवासी विकास विभागाने केला असून, खेळात सहभाग घेणा-या मुलं आणि मुली असे स्पर्धेत भाग घेणा-या, प्रत्येक खेळाडूंना पॅन, टी शर्ट, बूट, असे खेळाचे साहित्य देण्यात आले आहे.
जव्हार प्रकल्प स्तरीय क्रीडास स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उडघटक म्हणून जि. प.अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रकाश निकम, सभापती विजया दयानंद लहारे, उप सभापती दिलीप पाडवी, सरपंच लिलावती भोरे, माजी सभापती ज्योतीताई भोये, हरिचंद्र भोये, जि.प.सदस्य सुरेखा थेतले, मोखाडा उप सभापती नवसु दिघा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (भा.प्र.से.) आयुषी सिंह, क्रीडा प्रमुख संजय सूर्यवंशी, सहाय्यक प्रकल्प विजय मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी, तसेच क्रीडा आयोजक, अन्य मान्यवर आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, खेळाडू वर्ग, प्रेक्षक अन्य मान्यवर उपस्थित होते.