Type Here to Get Search Results !

Terms & Conditions

                  !! नियम व अटी  !! 


मी असे लिहून देतो की आज रोजी  मी ९१ इंडिया न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये प्रतिनिधी  म्हणुन कार्य करण्यासाठी शपथ पत्र सादर  करीत आहे . 


माझे कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल रेकॉर्ड नसून मी स्वतः सर्व साधारण व्यक्ती करिता त्याच्यावर झालेल्या अन्यायाकरिता तसेच समाजात चाललेल्या भ्रष्टाचाराचा विरोध करूण चॅनल च्या माध्यमाने उघड करण्याकरिता  मी चॅनल चा सभासद होऊ इच्छितो आहे. मी या चॅनल चे आखलेले सर्व नियमांचे  पालन करीन. तसेच या चॅनल चे सभासद म्हणुन असणारी फि भरण्यास तयार आहे .


चॅनल मध्ये सहभागी होण्या पूर्वी मला चॅनल च्या कमिटीने चॅनल चे कार्य सर्व नियम सविस्तर सांगीतले आहेत व् ते मला परिपूर्ण मान्य असून त्या सर्व कार्य व नियम समजून मी सह खुशीने चॅनल सोबत काम करण्यास तयार आहे.


जनसेवा अन्याय निर्मूलन करणे अन्यायाला वाचा फोडण्याकरिता  प्रत्येक घडामोडी जगा समोर अणण्यासाठी सदर मी न्यूज चॅनल मध्ये विलीन होत  आहे.या अगोदर मा‍झ्या हातून जे काही गुन्हे किंवा लोकांवर अन्याय झाला आसेल ते विरुन मी चॅनल च्या प्रवाहात सामिल होऊन अन्याया विरुद्ध लढण्यासाठी मी उपरोक्त पदभार घेत आहे. त्याकारिता मी चॅनल मध्ये निस्वार्थी पने सामाजिक कार्य करेन व लोकांवर होत असलेल्या अन्याय बद्दल लढा देईल व त्याबदल मी कोनाकडून ही कोणत्याही प्रकारे मोबदला घेणार नाही.


 मी चॅनल च्या परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार करणार नाही व मी कोणतेही खोटी बातमी देणार नाही . 


मी कोणतेही अमिषाला बळी पडून षडयंत्र करूण इतर कोणाची बदनामी होईल अशी कोणतेही कृत्य मा‍झ्या हातुन घड़नार नाही.  


मी कार्यरत असताना मा‍झ्या हातून इतर कोणालाही शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही याची मी जाणीव पूर्वक दखल घेईल व मी इतर कोणत्याही धर्माचा अपमान होईल किंवा मा‍झ्या हातून इतर लोकांच्या  धार्मिक भावना दुखवतील असे करणार नाही अशी मी शपथ घेतो. आणि मी माझे कार्य पूर्णपणे, प्रामाणिकपणे,  निस्वार्थीपणे, तन- मन- धनाने पार पाडेल .


 मी चॅनल मध्ये काम करताना चॅनल च्या कोणत्याही नियमाचे उलंघन करणार नाही. मी सदैव चॅनल च्या वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करेन. 


जर मी हे पद घेतल्यानंतर मा‍झ्या हातून कुठलाही गुन्हा अथवा गौर - गरीबांवर अन्याय केलेले आढल्यास  किवा कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार केलेला निदर्शनास आल्यास चॅनलच्या नियमाचे उलंघन केल्याबद्दल मी कारवाईस पात्र राहिल . 


मी केलेला कोणताही आर्थिक व्यवहाराला मी स्वता जबाबदार असेन व त्या आर्थिक नुकसानाची परत फेड करण्याची संपूर्ण जबाबदारी माझी स्वताची राहील या बद्दल चॅनल व चॅनल चे संचालक कमिटी जबाबदार राहणार नाही किवा माझ्या वर कुठल्याही प्रकारची पोलीस करावाही झाल्यास त्याच क्षणी मी चॅनल च्या प्रतिनिधी च्या पदावरून कायम स्वरूपी बडतर्फ झालेला आसेल व त्या गुन्ह्याची सर्व जबाबदारी ही वैयक्तिक माझी असेल त्या गोष्टीची चॅनलचा व चॅनलच्या संचालक कमिटीचा  काही एक संबंध नसेल. 


हे कुठलीही नशापाणी न करता व कुणाच्याही दबावाला बळी न पडता राजीखुशिने लिहून देत आहे.


हे लिहून दिलेली संपूर्ण माहिती सत्य आणि बरोबर आहे असत्य आढळून आल्यास व वरील माहिती मधून इतर गुन्हा घडल्यास मी भा.द.स.कलम ४२०,३५८,४१५,४१६,४१७,४१९,४६३,४७१,१२०,२९५,२९५(अ)२९८,५०६,५०७,५०९, भा.द. स. कलम १९९,२००,१९२ (२)  अन्वये होणाऱ्या कारवाईस पात्र राहीन याची मला जाणीव आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News