Type Here to Get Search Results !

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा विनवळ येथे सन २०२२-२३ मधील केंद्रीय क्रिडा स्पर्धा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा




शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा विनवळ येथे सन २०२२-२३ मधील केंद्रीय क्रिडा स्पर्धा समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात केंद्रीय क्रिडा स्पर्धेला सुरवात झाली.

पालघर जिल्हा प्रतिनिधी:सुनिल जाबर




जव्हार :- काल दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा विनवळ येथे सन -२०२२-२३ मधील केंद्रीय क्रिडा स्पर्धा समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात केंद्रीय क्रिडा स्पर्धेला सुरवात झाली. तीन दिवशीय क्रिडा स्पर्धेत एकुण १३ शाळांनी सहभाग नोंदवला आहे. ज्यामध्ये शासकीय आश्रमशाळा -०८ आणि अनुदानित आश्रमशाळा -०५ असून एकुण विद्यार्थी संख्या मुले -४३७ + मुली -४६१=८९८ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. क्रिडा स्पर्धा सूत्रसंचालन - दिपक गावंढा सर व हरिदा दळवी सर यांनी केले. केंद्रिय क्रिडा स्पर्धेचे सुरवात आदिवासी जननायक बिरसा मुंडा, आदिवासी क्रांतीकारक राघोजी भांग्रे, छत्रपति शिवाजी महाराज, विद्येची देवता सरस्वती देवी, शक्ती देवता मारूती राया या देवतेंची प्रतिमा व दिप प्रज्वलन करून केली.
कार्यक्रमाचे प्रस्तावना विनवळ शाळेचे मुख्याध्यापक -एस.एस.सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम विशेष ध्वजारोहण, क्रिडाज्योत प्रज्वलन, खेळाडू संचलन, खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जपावी नियमांचे शिस्तीचे पालन करावे म्हणून क्रिडासपथ घेऊन उद्घाटनाचा पहिला सामना १९ वर्षे वयोगटातील देहेरे विरूद्ध चांभारशेत यांच्यात सन्मानित व्यासपीठ यांच्या उपस्थितीत खेळविण्यात आला. या क्रिडास्पर्धेकरिता लिलावती भोरे मँडम(सरपंच-विनवळ),तुळशिराम मोरघा साहेब,कमळाकर भोरे साहेब, संदिप खुताडे (मा. सरपंच),काशिनाथ चिभडे, भास्कर खुताडे, सांगविकर साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी), केणी सर. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad