आरपीआय आठवले पक्षाच्या ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस पदी प्राध्यापक शरदचंद्रजी सोनवणे यांची निवड
मुरबाड दिनांक 11 प्रतिनिधी :- लक्ष्मण पवार
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील उच्चविद्या विभूषित, अभ्यासू व्यक्तीमत्व प्रा.शरदचंद्र सोनावणे यांची रिपाइं आठवले पक्षाच्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असून रिपाई कडून महत्वाची जबाबदारी त्यांच्या वर आता सोपवण्यात आली आहे.सरचिटणीस पदी नियुक्ती बाबत प्रा. सोनावणे यांच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ठाणे जिल्हा ग्रामीणची तातडीची महत्वपूर्ण सभा केंद्रीय संघटक सचिव ठाणे व पालघर जिल्हा निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी सुरेशदादा बारशिंग यांच्या अध्यक्षते खाली तसेच रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड व ठाणे प्रदेश अध्यक्ष बाळाराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्हा ग्रामीणची पद पुनर्रचना करण्यासाठी कल्याण येथे सभा पार पडली.
या सभेत सर्वानुमते मुरबाड मधील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू व्यक्तीमत्व प्रा.शरदचंद्र सोनावणे यांची ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी पुनर्रचने अंतर्गत नेमणूक करण्यात आली.या महत्त्वपूर्ण सभेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दलितमित्र अण्णासाहेब रोकडे यांनी मार्गदर्शन केले.या सभेस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अनील धनगर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष बी. के. गायकवाड, ठाणे जिल्हा सल्लागार व ज्येष्ठ नेते जयवंत सोनावणे, महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष विनोद थोरात, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष अरुण गायकवाड, ठाणे जिल्हा ग्रामीण सहसचिव प्रवीण गायकवाड, विनोद मिश्रा, दशरथ गायकवाड, रामा कांबळे,नितीन खंडागळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी मुरबाड तालुका रिपाइं अध्यक्ष दिनेश उघडे, उपाध्यक्ष लक्ष्मण भांडे, गणेश तुपे व सर्व पदाधिकारी यांनी नव नियुक्त सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण प्रा.शरदचंद्र सोनावणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.