मुरबाड दिनांक 12 प्रतिनिधी
(लक्ष्मण पवार )
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शन व आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर कष्टकरी ,असंघटित कामगार, शासकीय अशासकीय कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी न्याईक लढा उभा करण्यासाठी संपूर्ण भारतभर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन काम करत असून गाव तेथे रिपब्लिकन शाखा या आठवले साहेबांच्या संकल्पनेचा उगम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आजोळ भिमाईभूमी मुरबाड तालुक्यातून होताना दिसून येत आहे.
रिपब्लिकन चळवळीचे ऐक्य अबाधित आणि टिकून ठेवण्याचे मोलाचे काम मुरबाड व ठाणे जिल्ह्याचे नेते भगवानजी पवार यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन जोमाने काम करताना दिसून येत आहे
नुकताच जिल्ह्याचे नेते भगवानजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष दादासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत विजय अरविंद घायवट यांची रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या मुरबाड तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे घायवट यांच्या निवडीमुळे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनला बळकटी मिळाली असून तन मन धनाने अहोरात्र कष्टकरी असंघटित कामगार तसेच दीनदुबळ्यांसाठी काम करणार असल्याचे विजय घायवट यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे
या निवड प्रक्रियेसाठी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन शिक्षण विभाग व फेडरेशनचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख संजय थोरात, ठाणे जिल्हा नेते भगवान पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे ठाणे जिल्हा सरचिटणीस गौतम रातांबे, फेडरेशनचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सेवक नागवंशी जिल्हा संघटक नवनाथ रणखांबे, उपाध्यक्ष भरत चव्हाण आत्माराम बिऱ्हाडे, विजय ठोसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.