मुरबाड दिनांक 12- प्रतिनीधी लक्ष्मण पवार
मुरबाड नगरपंचायतच्या अखत्यारित असलेल्या बागेश्वरी आॕक्सिजन पार्क कडे जाण्यासाठी असलेल्या रस्ताची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या आॕक्सिजन पार्ककडे जाण्यासाठी पर्यटकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. मुरबाड नगरपंचायतने पाण्याच्या टाकी पर्यत सिमेंट काॕंक्रीटिचा रस्ता बनविला आहे परंतु तेथून पुढे बागेश्वरी तलाव फक्त १ कि.मी.चे अंतर आहे.
हा रस्ता झाल्यास पर्यटकांना होणारा ञास कमी होईल तसेच या रस्त्यावरुन पुढे वेहरेवाडी , नविवाडी , वडाचीवाडी , मानिवली येथिल नागरिकांनाही दगड गोट्यांतून प्रवास करावा लागत आहे त्यांचीही सुटका होईल मुरबाड नगरपंचायतने लवकरात लवकर हा रस्ता बनवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.