इंग्लिश मीडियम शाळेकडून चिमूरड्यांची सुरक्षा धोक्यात
मुरबाड दिनांक 11 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
जिथे विषय गंभीर तिथे मनसे खंबीर.. मुरबाड विद्यार्थी सेनेचे मनसे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव हे नेहमीच अन्यायाविरुद्ध लढणारे कार्यतत्पर मुरबाड शहरातील विविध समस्यांना वाचा फोडणारे आपल्या धारदार लेखणी द्वारे प्रशासनाला व अधिकाऱ्यांना आपल्या कर्तुत्वाची जाण करून देणारे मुरबाड शहरातील एकमेव तरुण तडफदार नेतृत्व असून नुकताच मुरबाड शहरातील इंग्लिश मीडियम शाळेतील मुलांच्या प्रश्नांना वाचा फोडून मुरबाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना पत्र धाडले असून याबाबत काय कारवाई होते याबाबत प्रशासनाला जागे केले आहे
मुरबाड शहरात इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा आहेत. त्या ठिकाणी अनेकांची लहान लहान मुलं शिकत आहेत. येथील शाळा चालकांनी विद्यार्थ्यांना घरी जाण्या येण्या करिता बसेस चालु केल्या असुन त्या बसचा खर्च सुद्धा पालक भरत असतात.तरीही चालक या गाड्यांमध्ये प्रमाणाच्या बाहेर विद्यार्थी भर भरून घेऊन जातात.शाळा व्यवस्थापक यांच्या चुकी मुले लहान मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो. शिक्षणाधिकारी यांनी या कडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनर्माण विद्यार्थी सेनेचे मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी केली आहे .