कृषी मेळावा आयोजित ग्रुप ग्रामपंचायत वावर वांगणी येथे संपन्न
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
पालघर जिल्यातील जव्हार मधील अतिदुर्गम मध्ये असलेली ग्रुप ग्रामपंचायत वावर वांगणी येथे आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कृषी मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळावा साठी रुईघर बोपदरी आणि वावर वांगणी या ग्रामपंचायत चे नागरिक या मेळावा साठी उपस्थित होते.
वावर वांगणी आणि रुईघर बोपदरी या ग्रामपंचायत मध्ये आज काहीच उद्योग धंदे नसल्याने येथील नागरिक बरेचसे बेरोजगार बघायला मिळत आहेत त्या उद्देशाने आपल्याच भागात आपल्याला रोजगार कसा उपलब्ध होईल या साठी जव्हार कृषी विभाग यांच्या अंतर्गत मेळावा हा थेट शेतकऱ्यांसमोर आयोजित केला होता या वेळी तालुका कृषी अधिकारी यांनी कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती देवून आणि त्यांचे महत्त्व पटवून दिले आणि शेतकऱ्यांना कशा याचा लाभ मिळवता येईल याकडे आम्ही लक्ष देवू असे आश्वासन दिले.
हा मेळावा यशवंत बुधर साहेब व वावर वांगणी ग्रामपंचायत चे सरपंच विनोद बुधर आणि उपसरपंच रमेश बीज यांच्या सहकार्याने मेळावा आयोजित केला होता याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी वसंत नागरे साहेब , मंडळ कृषी अधिकारी संजीव साहेब,सहाय्यक अधीक्षक विजय मुकणे साहेब,वरिष्ठ लिपिक रवी तायडे सर,तसेच लिपिक संदीप कोळी सर,कृषी पर्यवेक्षक इंगळे साहेब,कृषी सहाय्यक देवरे साहेब, व अहिरे सर,जाधव सर व इतर ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.