कृषी विभाग जव्हार व वावर वांगणी ग्रामपंचायतच्या नागरिकांनी वावर येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधला
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
आज बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी कृषी विभाग जव्हार व वावर वांगणी ग्रामपंचायत चे नागरिक यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना समोर ठेवून कृषी अधिकारी व वावर वांगणी ग्रामपंचायत चे नागरिक एकत्र येऊन श्रमदानातून वनराई बंधारा बांधला.
पावसाळ्यात पाणी पडल्यावर वाहून जाते.परिणामी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होते यावर कुठे तरी मात व्हावी यासाठी हा छोटासा प्रयत्न कृषी विभाग व वावर वांगणी ग्रामपंचायत चे नागरिकांनी केला आहे या पाण्याचा उपयोग गाई - गुरांना , पशुपक्षाना, जनावरांना पिण्यासाठी तसेच नागरिकांना धुण्या भांड्या साठी वापर व्हावा त्याचप्रमाणे पाणी वाहत न जाता ते जमिनीत मुरावे आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी हा छोटासा प्रयत्न करत एक सुंदर संदेश दिला आहे.
या वेळी वावर वांगणी ग्रामपंचायत चे सरपंच विनोद बुधर,तालुका कृषी अधिकारी नागरे साहेब व मंडळ कृषी अधिकारी संजीव साहेब, सहाय्यक अधीक्षक मुकणे साहेब, वरिष्ठ लिपिक रवी तायडे सर, तसेच संदीप कोळी सर,इंगळे साहेब,देवरे साहेब,अहिरे सर,जाधव सर तसेच ग्रामस्थ बाळू बुधर,मनोज गरेल,काशिनाथ बुधर,अमोल गरेल ,अनिल गरेल , व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.