तळोदा:- विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड येथे तुळशी पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन व्ही मराठे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नारायण जगदाळे व ऋषिकेश ठाकरे उपस्थित होते. प्रथम भारत मातेचे प्रतिमा व तुळशीचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी नारायण जगदाळे यांनी आयुर्वेदिक तुळशी चे महत्त्व सांगितले तद्नंतर शालेय विद्यार्थ्यांनी तुळशी पूजन केले.
यावेळी आर बी कुवर, ए ए शेंडे, एस ए सुर्यवंशी, डी एन गिरासे, आर के पाडवी, श्रीमती आशा जाधव श्रीमती आर आर वळवी व विद्यार्थी उपस्थित होते.
विवेक चव्हाण तळोदा प्रतिनिधी