क्लाऊन विथ आऊट बॉर्डर इंडिया संस्था व कलाकार यांची वावर आश्रमशाळेला भेट
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम मध्ये असलेली निसर्गाच्या सानिध्यात वसलेली प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर या शाळेला क्लाऊन विथ आऊट बॉर्डर इंडिया संस्था व कलाकार यांनी भेट देऊन येथील विद्यार्थांना प्रसिद्ध मराठी मालिका मधील राजा राणीची जोडी हे नाटक करण्यात आले.
त्याचप्रमाणे आऊट बॉर्डर इंडिया येथील आलेल्या सर्व मान्यवरांचे येथील सर्व शिक्षकांनी श्रीफळ देवून सगळ्यांचे स्वागत करण्यात आले त्यांचे बरोबर परदेसी पाहुणे ४ आणि मुंबई हून २ कलाकार सागर भोईर ,श्रीराम चौधरी ,मराठी मालिका राजा राणीची जोडी मधील कलाकार अंकिता निक्रड, महाराष्टाची हास्य जत्रा कलाकार प्रियदर्शनी इंदलकर या सर्वांनी या कार्यक्रमाला योगदान दिले.
आलेल्या पाहुण्यांनी येथील विद्यार्थांना योग्य प्रकारे पुढे कशी प्रगती होईल यावर मार्गदर्शन केले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गारुडकर सर,राठोड सर,साळुंखे सर,पाटील सर,तसेच रणधीर सर,पवार सर ,ठाकरे सर,व कोल्हाळ सर इतर सर्व शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.