पालघर जिल्हा प्रतिनिधी : सुनिल जाबर
जव्हार :- दिनांक -१७ नोव्हेंबर २०२२ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या अंतर्गत चाईल्ड हेल्प फाऊंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा विनवळ येथे दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत पोश व पोक्सो कायदा यांची माहिती देण्यासाठी सन्मा-मिना लोखंडे, व -पुष्पा कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. संपूर्ण कार्यशाळा ही दृश्य-श्राव आणि तांत्रिक बाब व साधने उपलब्ध करून देण्यास शाळेचे शिक्षक किशोर वसंत सातवी यानी सहकार्य केले या कार्यशाळेत विनवळ,देहेरे, दाभोसा,ओझर,दाभेरी,वांगणी, न्याहाळे इ. शासकीय शाळेतील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार चे श्री - सुभाष परदेशी साहेब (सहाय्यक प्रकल्प अधिकारी -शिक्षण विभाग), -सांगवीकर साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी),-एस, एस, सुर्यवंशी (मुख्याध्यापक-विनवळ) यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यशाळेत महिला व विद्यार्थी लैंगिक छळ प्रतिबंध कायद्याची माहिती देण्यात आली. लैंगिक छळ ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. हा छळ शाळेतून समाजातून नष्ट व्हावा. यासाठी कायद्याचे नाँलेज असणे,समाजातील प्रमुख परिवर्तन शील घटक म्हणून शिक्षक याकडे पाहिले जाते.
या कार्यशाळेत पाँश व पोक्सो कायद्याची संकल्पना, अधिकार, हक्क व जबाबदारी, लैंगिक छळाचे प्रकार,शालेय स्तरावरील सुरक्षा दृष्टीने केलेल्या समित्या. लैंगिक गुन्हा नोंदविण्याकरिता संपर्क क्रमांक -1098 अशी सखोल माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला सर्व वर्ग -३ व वर्ग -४ कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व कर्मचार्यांनी कार्यशाळेची प्रशंसा केली. कार्यालयाचे कौतुक केले, आभार व्यक्त केले. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - दिपक गावंढा सर यांनी केले.
सर्वांचे आभार मानून पहिल्या दिवसाच्या कार्यशाळेची सांगता करण्यात आली.