Type Here to Get Search Results !

ढाढरी या गावात एका शेतकऱ्याने भात कापणी करून ठेवल्याच्या ठिकाणी आग लागल्याने शेतकरी चिंतेत ?





ढाढरी या गावात एका शेतकऱ्याने भात कापणी करून ठेवल्याच्या ठिकाणी आग लागल्याने शेतकरी चिंतेत ?

पालघर जिल्हा प्रतिनिधी:सुनिल जाबर

       जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम असलेली ग्रामपंचायत जांबुळमाथा येथील ढाढरी या गावांमधील धवळू नावजी माडी या शेतकऱ्याने १० ते १२ एकर शेती मध्ये भाताची लागवड केली होती.आणि ती पूर्ण पणे भात कापणी करून स्वतच्या शेतामध्ये एका ठिकाणी जमा करून ठेवले होते.त्याला अचानक आग लागल्याने ते पूर्ण जळून त्याची खाक झाली आहे.




       जव्हार तालुका हा पूर्णपणे डोंगराळ भाग असून येथील सर्व शेतकरी हे पूर्णपणे त्यांच्या शेतीवर अवलंबून असतात आणि या ठिकाणी झाडी डोंगर असल्याने पावसाळा मध्ये भरपूर पाऊस पडतो जुलै ते सप्टेंबर या महिन्यात त्यांची पूर्ण एका वर्षाची लागवड करत असतात .नंतर भात लागवडी नंतर पूर्णपणे कोरडे पडल्याने येथील शेतकरी पूर्ण शेत मोकळं सोडत असतात त्यामुळे धवळू नावजी माडी हा शेतकरी आता खूपच चिंतेत पडला आहे.

        आग लागली अस कळताच स्वत शेतकरी धवळू नावजी माडी व त्यांचा मुलगा अनिल धवळू माडी आणि त्यांची पत्नी व इतर सर्व ग्रामस्थ यांनी आग लागल्याचे ठिकाणी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले परंतु आग जास्त असल्याने काहीच करू शकले नाही.शेवटी भात पूर्ण जळून त्याची खाक झाली त्यांनतर शेतकरी स्वतः म्हणाला की आमची पूर्ण एका वर्षाची कमाई गेली आहे आता आम्ही एवढे महिने खायचे काय? अशा प्रश्न पडला आहे तर यांचा लवकरात लवकर पंचनामा करून मला भरपाई मिळावी .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad