Type Here to Get Search Results !

भारत जोडो यात्रेत उद्या पवार, आदित्य होणार सहभागी'- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण




भारत जोडो यात्रेत उद्या पवार, आदित्य होणार सहभागी'- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : भारत जोडो यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील अंतिम टप्प्यात म्हणजेच शुक्रवारी (११ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आज, गुरुवारी भारत जोडो यात्रेला उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा बुधवारी जिल्ह्यात तिसरा मुक्काम झाला. तेलंगणमधून सोमवारी रात्री राज्यात दाखल झालेल्या या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील, दिग्विजयसिंह, जयराम रमेश, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, खासदार कुमार केतकर, खासदार रजनी पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार प्रणिती शिंदे सहभागी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांची यात्रेतील पूर्णवेळ उपस्थिती लक्षणीय ठरली आ
देगलूर, नायगाव तालुक्यांतील टप्पा पूर्ण करून गुरुवारी ही यात्रा नांदेड शहरात दाखल होणार आहे. सायंकाळी खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असून, त्याची जय्यत पूर्ण झाली आहे. या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. याशिवाय सभेला काँग्रेससह महाविकास आघाडीतील पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत यात्रा ११ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातून हिंगोलीकडे प्रस्थान करणार आहे. अंतिम टप्प्यात म्हणजेच समारोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. ‘भारत जोडो यात्रा लोकचळवळ बनली असून, समाजातील सर्वच घटकांतील नागरिकांचा यात्रेला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी होणारी जाहीर सभा अभूतपूर्व असेल,’ असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जिल्ह्याच्या सर्वच भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक व तरुणांचा यात्रेतील सहभाग, तसेच ठिकठिकाणी होणारे जंगी स्वागत यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
चार राज्यांत प्रवास करून, ही यात्रा सोमवारी राज्यात दाखल झाली. या यात्रेचा नांदेड जिल्ह्यात चार दिवस मुक्काम आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देगलूर व भोपाळा येथे झालेल्या छोटेखानी सभांतून खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. बुधवारी सायंकाळी शंकरनगर येथून सकाळी निघालेली यात्रे दुपारी नायगाव येथे थांबली. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी तीन वाजता यात्रा पुन्हा सुरू झाली. सायंकाळी कुष्णूर येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर कोपरा सभा पार पडली. शेतकरी, नागरिक, कामगार, कष्टकरी, तसेच छोट्या व्यावसायिकांच्या समस्या ऐकल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.
नोटंबदीने रोजगार नष्ट झाले’
‘सरकारला सामान्य नागरिकांचे काही देणे घेणे नाही. मोजक्या लोकांसाठी व त्यांच्या हितासाठी हे सरकार काम करीत आहे. देशातील हे वास्तव बदलण्याची गरज असून, त्यासाठीच ही पदयात्रा आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले. ‘परदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे स्वप्न दाखवून करण्यात आलेली नोटबंदी फसवी होती. या नोटबंदीने अनेकांचा रोजगार नष्ट झाले. एकीकडे जीएसटी, नोटबंदी व दुसरीकडे खासगीकरण यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढतच गेल्या. देशातील वातावरण अस्थिर करण्याचे उद्योग सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहेत,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ‘यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांमध्ये एकता आणि बंधुभाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अखंड भारतासाठी निघालेली ही यात्रा आपला टप्पा पूर्ण करील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
दरम्यान, बुधवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सद्यस्थितीत देश, लोकशाही, समाज, राजकारण आणि आर्थिक स्थितीला भाजपकडून धोका असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘भाजपला खऱ्या अर्थाने काँग्रेसच विरोध करू शकते. भाजपला विरोध करणाऱ्या सर्वांनाच आम्ही पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे,’ असेही जयराम रमेश म्हणो. या वेळी नाना पटोले यांनी मनोगत व्यक्त केले. बुधवारी यात्रेमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad