Type Here to Get Search Results !

राघोजी भांगरे यांच्या 217 व्या जंयती निमित्त राघोजी भांगरे व क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची मुळझरा नखातेवाडी येथे भव्य मिरवणूक.




राघोजी भांगरे यांच्या 217 व्या जंयती निमित्त राघोजी भांगरे व क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची मुळझरा नखातेवाडी येथे भव्य मिरवणूक.




किनवट तालुक्यातील मुळझरा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या नखातेवाडी येथे दि 8 नोव्हेंबर 2022 रोजी आदिवासी समाजातील आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांची 217 वी जयंती साजरी करण्यात आलीय. या निमित्ताने जेतवन बुद्ध विहार मुळझरा पासून ते नखातेवाडी पर्यंत राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांनी करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आशाताई नंदकुमार नखाते हिने स्वागतगीत गायन केले तर, भाग्यश्री सुभाष नखाते हिने आदिवासी समाजाची भाषणातून व्यथा मांडलीय व राजेश गायकवाड यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रयावर प्रकाश टाकलाय 
 याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षास्थानी कपिल करेवाड माजी पंचायत समिती किनवट उपसभापती, प्रमुख पाहुणे भाजपाचे तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार , शिवणी येथील यादव आमले , साईनाथ वानोळे बिरसा क्रांती दलांचे किनवट तालुका अध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सुनील वानोळे, सरपंच प्रतिनिधी गोविंद तुपेकर, प्रकाश नखाते, दत्ता झाडे , देविदास चाकोते , हनमंत चाकोते , रोहिदास खोकले, खंडू गुंडे , पुनाजी भिसे, मारोती नखाते, सुभाष मिरासे, मैसाजी भिसे नामदेव नखाते उत्तम मिराशे व सूत्रसंचालन व समारोप शिक्षक परमेश्वर भडंगे यांनी केले या कार्यक्रमाला गावातील समाज बांधव उपस्थित होता.





91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad