लोहा प्रतिनिधी :- विठ्ठल कतरे पांगरेकर
लोहा तालुक्यातील भोपाळवाडी फाटा येथील डॉ.अविनाश विक्रम डांगे राहणार पोखरभोसी यांचे गोविंद गार्डन हाडको जवळील रोडवर डुक्करची व मोटार सायकलच्या एकदम समोर आल्यामुळे अपघात झाला आहे. डॉ. अविनाश यांचे वडील बिमार असल्यामुळे ते औरंगाबाद येथे हायकोर्ट रेल्वेगाडीने औरंगाबादला जात होते. समोरून अचानक डुक्कर आल्यामुळे हा अपघात घडला आहे. डॉ. अविनाश डांगे हे अतिशय हुशार हसतमुख व्यक्तीमत्त्व होते. ते रूग्णांना अतिशय जिव लावून ईलाज करीत होते. ते गरीबांंचे मायबाप होते. त्यांच्या या अपघाती निधनाने भोपाळवाडी व पोखरभोसी येथील जनतेतून हळहळ व्यक्त केली जात आहे.