Type Here to Get Search Results !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून फुलसावंगी येथील पत्रकारांचा आंदोलनाचा इशारा




ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून फुलसावंगी येथील पत्रकारांचा आंदोलनाचा इशारा

 महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव महागाव तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या फुलसांवगी येथील जिल्हा परिषद हायस्कुल, उच्च प्राथमिक उर्दु शाळा, उच्च प्राथमिक मराठी शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षक पदे तात्काळ भरण्यात यावे अन्यथा आम्ही गावातील सर्व पदाधिकारी, नागरीक व पालक वर्ग नाईलाजास्तव रस्त्यावर शाळा भरवु
      उच्च प्राथमिक मराठी शाळे मध्ये ३०५ विद्यार्थी संख्या असुन १ते४ सेमी इंग्रजी व मराठी अशा एकुण ८ तुकड्या असुन मंजुर १२ सहाय्यक शिक्षक व १ उच्च श्रेणी मुख्याध्यापक कसे १३पदे मंजुर असुन आज रोजी फक्त ५ सहाय्यक शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये ८६० विद्यार्थी संख्या असुन १२ तुकड्या असुन येथे मंजुर पदे ३१ असुन आज रोजी ११ सहाय्यक शिक्षक १ उच्च श्रेणी मुख्याध्यापक व २ परिचर असे १४ लोक आहेत तर १७ पदे रिक्त आहेत. तसेच उच्च प्राथमिक उर्दु शाळे मध्ये ३२२ विद्यार्थी असुन ८ तुकड्या आहेत. येथेही १२ सहाय्यक शिक्षक तर १ उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद मंजुर असुन आज रोजी येथे ६ सहाय्यक शिक्षक कार्यरत असुन ६ पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यात सर्वात चांगली विद्यार्थी संख्या ही फुलसावंगी तील जिल्हा परिषद च्या तिन्ही शाळेत असताना ही केवळ प्रशासनाच्या उदासीन व टेबल वर बसुन बाबुगीरी करणाऱ्या कर्मच्यांन कडुन बदलुन जाणाऱ्या शिक्षकांचे चोचले पुरवले जात असल्याने ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थ्यांनचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने येत्या ०८/१०/२०२२ पर्यंत येथील जिल्हा परिषद च्या तिन्ही शाळेची रिक्त पदे भरण्यात यावी अन्यथा गावातील सर्व पदाधिकारी, नागरिक व पालक विद्यार्थ्यां सह १०/१०/२०२२ रोजी फुलसावंगी येथील राष्ट्रीय महामार्गावर भरवतील या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर काही विपरीत घटना घडल्यास सर्वस्वी शासन जवाबदार राहील असे निवेदन नवाब जानी कमरबेग उपसरपंच,शेख अनिस अ.रहेमान अध्यक्ष शाळा व्यवस्थापन, रेवती विवेक पांढरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,कुणाल नाईक, दिनेश नाईक, बाबु खान उमरदराज खान,गजानन प्रतापवार, अनिल राठोड, संदीप वायकुळे,मंगलाबाई वैद्य,शाहिन इकबाल पठाण,सुलोचना व्हडगीरे,सारजा वाघमारे,सईदाबेगम ईक्रामोद्दीन नवाब, रेखा भगत,राजकुमारी भोयर,अंजुम परविन शेख अन्सार,कयामोद्दीन नवाब,शेख तसलीम शेख अयुब,संजय जाधव, शैलेश वानखेडे, बाबुराव व्हडगीरे, गणेश भगत, भगीरथ नाईक, शेख अयुब यांनी जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शिक्षण अधिकारी, तहसीलदार महागाव, गटविकास अधिकारी महागाव व ठाणेदार महागाव यांना निवेदन देण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad