भातकुली प्रतिनिधी - वैभव भूजाडे
वलगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भातकुली तालुक्या मधील टाकरखेडा संभु येथे दि. 7/10/2022 रोजी MH29 AR 3335 या क्रमांकाच्या गाडीमध्ये काही लोक दुपारच्या वेळी गावामधे आले. त्यामधे अशोक गलबले सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व त्यांचे काही नातेवाईक रामराव बांडबुचे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करू लागले त्यांना मारहाण करू लागले. बघता बघता संपूर्ण चौकातील लोक एकत्र आले.त्यामधे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष राजेश कनोजे आणि गावातील ज्येष्ठ नागरिक गुड्डू भाई सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी त्या गाडीमध्ये एकूण 4 ते 5 लोक होते. वाद एवढा भयानक टोकावर पोहोचला की शिवीगाळ आणि झालेली मारहाण सहन न झाल्यामुळे त्या परिवारातील एका स्त्रीने आत्महत्या करायचं प्रयत्न केला. तिला तत्काळ रुग्णालयामध्ये हलविण्यात आले.
मारहाण रोकण्याचा प्रयत्न राजेश भाऊ कनोजे आणि गुड्डू भाई यांनी केला असता अशोक गलबले सेवानिवृत्त पोलिस अधिकारी यांनी , मी पोलिस आहे म्हणत अरेरावी केली. आणि अंगावर धावून गेले.
बघता बघता या भांडणाला रौद्र रूप धारण केले.
मारहाण केल्यानंतर पळून जायची तैयारी सुरू असताना नागरिकांनी त्यांची गाडी रोखून धरली आणि 112 या टोल फ्री वर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती राजू भाऊ कनोजे यांनी प्रतिनिधी वैभव भूजाडे यांना फोन करून दिली आणि राजू भाऊ कनोजे सोबत प्रतिनिधी सुद्धा पोलिस स्टेशन ला पोहोचले.
91 इंडिया न्यूज प्रतिनिधी वैभव भुजाडे वलगाव चे ठाणेदार अहेरकर यांना भेटायचं प्रयत्न केला असता तुला काय करायचे , त्यांचं ते पाहतील, अशा परखड शब्दात प्रतिक्रिया दिली.
तसेच तिथे FIR ची प्रक्रिया सुरू झाली.
ठाणेदार यांच्या परखड प्रक्रियेमुळ स्थानिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले.
पोलिस प्रशासन त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची बाजू घेईल की,ज्यांच्यावर अन्याय झाला त्या परिवाराची?
या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी करून त्या पीडित परिवाराला योग्य न्याय मिळेल का?
आता वलगाव पोलिसांची भूमिका काय असेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
घटनेच्या वेळी गावातील पोलिस पाटील अजुभाऊ मोहोकर तसेच तंटामुक्ती अध्यक्ष राजेशभाऊ कनोजे सोबत आणखी गावातील काही नागरिक सुद्धा घटनेच्या ठिकाणी होते.