भातकुली प्रतिनिधी - वैभव भुजाडे
टाकरखेडा संभु येथे दरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा दुर्गादेवीचे उत्साहात आगमन झाले आहे. अशा मधे गावातील श्रीराम दुर्गा उत्सव मंडळ टाकरखेडा संभु या मंडळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मंडळाचे अध्यक्ष पूनित काळे तसेच उपाध्यक्ष प्रतीक भागवत आणि सचिव प्रशांत खांदे यांनी गरजू मुलांना बुक आणि पेन यांचे वाटप केले.
शिक्षण वाघिणीचे दूध आहे.खऱ्या अर्थानं ही शिकवण सगळ्या गावासमोर मांडली आहे.त्यामुळं त्या मुलांमधे शिक्षणाची ओढ निर्माण होईल अशी आपुलकी या मंडळाने व्यक्त केली.
नावाप्रमाणेच काम अशी ओळख श्रीराम दुर्गा उत्सव मंडळ यांनी केली.
गावात सर्व स्तरावरून मंडलचे कौतुक होत आहे .