सोयगाव, दि.०७..शासनाला पाठविण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण माहितीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी न करता दि.३० सप्टेंबर पासून सोयगाव पंचायत समितीत गैरहजर असलेल्या गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांची कारणे दाखवा बजावून त्यांचा खुलासा मागवून त्या गटविकास अधिकाऱ्यांला निलंबित करा असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना यांना दिले आहे. सोयगावच्या शुक्रवारी सायंकाळी आयोजित केलेल्या तालुका समितीच्या बैठकीत ही गैरहजर असल्याने या गटविकास अधिकाऱ्यांला भोवणार असून शुक्रवारी सायंकाळी सोयगाव तहसिल कार्यालयातील तालुका समन्वय बैठकीला या गटविकास अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी तालुका समन्वय बैठक घेतली यामध्ये नगर पंचायत, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, कृषी, तहसिल,पंचायत समिती,महावितरण,आदी यंत्रणांचा आढावा घेतला यामध्ये शहर विकास साठी नगर पंचायत कडून आढावा घेतला तर वनविभागाच्या आढाव्यात वन्यप्राण्यापासून सोयगाव-सिलोड मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे वनविभागाच्या वतीने या वन्यप्राण्यांना जेरबंद करून सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे यासाठी प्रस्ताव शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांना केल्य आहे तसेच फर्दापुर येथील भीमपार्क व शिवपार्क या कामाला आगामी पंधरा दिवसात सुरुवात करून भीमपार्क साठी तालुका समिती गठीत करण्याचा सूचना केल्या आहे.
सोयगावच्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पारदर्शक पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी हात आखडता घेऊ नये अशा सूचना कृषी विभागाला दिल्या आहे..
सोयगाव साठी भव्य कृषी भवन उभारण्यासाठी शासन पातळीवरून मंजुरी देण्यात येईल त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने दोन एकर जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवावा अशा सूचना करून त्या कृषी भवनात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीच्या शेतीचे प्रशिक्षण देण्यात येईल त्यासाठी कृषी भवनात शेतकरी प्रशिक्षण केंद्र,निवासी कार्यालय आदी सुविधा करण्यात येईल कृषी विभागाने तातडीने या संदर्भात प्रस्ताव पाठवावा अशा सूचना दिल्या--आगामी तीन महिन्यात सीयगाव तालुक्यातील सर्व रस्ते व्यवस्थित करा त्यासाठी सिलोड-सोयगाव तालुक्यातील रस्ते दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यासाठी पन्नास कोटी रु मंजूर करण्यात आले आहे सोयगाव-शेंदूरणी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे दिवाळी पूर्वी या रस्त्याची डागडुजी पूर्ण करा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
शेती पंपाची सोयगाव साठी पन्नास अतिरिक्त रोहित्र पुरविण्यात येऊन मंगळवारी मुंबईत महावितरण चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांची सीयगव तालुक्यातील वीज पुरवठ्याची समस्या बैठक घेत आहे त्यामध्ये पन्नास रोहित्रे देण्याची घोषणा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले सोयगाव पोलीस वसाहत आणि फर्दापुर पोलीस ठाणे व वसाहत यासाठी मंजुरी देण्यात आली असून सोयगाव पोलीस वसाहत साठी जागेचा प्रस्ताव पाठवा तसेच फर्दापुर पोलिस ठाणे व वसाहत साठी तीन एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे ती जागा तात्काळ फर्दापुर पोलीस ठाण्याचे नावे उतरविण्यात येईल
सोयगाव पंचायत समिती पूर्णपणे गैरहजर होती गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी आढावा बैठकीत दांडी मारली त्या गटविकास अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा असे निर्देश विकास मीना यांना देण्यात आले आहे. तब्बल १५ दिवसापासून सतत गैरहजर असलेला हा गटविकास अधिकारी लंपी आणि नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे.