सोयगाव प्रतिनिधी :- बाळू शिंदे
मुसळधार पावसामुळे लोंबकळलेला पाऊस,दुसऱ्या छायाचित्रात कपाशीचे नुकसान..
सोयगाव, दि.०७..पहिल्याच वेचणी वर आलेल्या कपाशी पिकांना गुरुवारी रात्री चाळीस मिनिटे तडाखा दिल्याने वेचणीला आलेल्या कापसाच्या धागे लोंबकलत असल्याचे शुक्रवारी आढळून आले,सोयगाव तालुक्यात गुरुवारी रात्री चारही मंडळांना चाळीस मिनिटे जोरदार तडाखा दिल्याने सोयगाव तालुक्यातील लांब धाग्याचा कापूस मात्र शेतातच लोंबकळला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
लांब धाग्याच्या उत्पन्नात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्यात पहिल्याच वेचणी वर आलेला ठिबक वरील कापूस वेचणीला आलेला असतांना गुरुवारी रात्री झालेल्या चारही मंडळातील मुसळधार पावसात कापूस लोंबकलला असून कोवळ्या असलेल्या कोरडवाहू कपाशीच्या पुड्या व फुलांना गळ लागली त्यामुळे या मुसळधार पावसाचा कोरडवाहू व बागायती दोन्ही क्षेत्रातील कपाशी पिकांना फटका बसला आहे.दरम्यान, सोयाबीन, मका या पिकांनाही फटका बसला असून सोयगाव तालुक्यात अकरा हजार हेक्टरवरील कापूस शेतातच लोंबकळत असल्याचा प्राथमिक अहवाल सूत्रांनी दिला आहे.
वेचणी अर्धवट, पावसाने केली निराशा
पावसाची गरज असतांना मात्र झालेला मुसळधार पाऊस खरिपाच्या पिकांसाठी धोक्याचा ठरला असून या मुसळधार पावसाने बागायती क्षेत्रातील अकरा हजार तर कोरडवाहू क्षेत्रातील तेरा हजार असा तेवीस हजार ४५६ हेक्टरवरील कपाशी पिकांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे दरम्यान सोयगाव तालुक्यात गुरुवारी रात्री चाळीस मिनिटातच होत्याचे नव्हते झाले या चाळीस मिनिटं च्या धुवाधार पावसाने तेवीस हजार हेक्टरवरील कपाशी ला फटका दिला तर चार हजार ५८५ हेक्टरवरील मका सोयाबीन पिकांची माती झाली आहे चाळीस मिनिटात १२३ मी मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी पुन्हा तासभर मुसळधार पावसाने सोयगाव तालुक्यात तडाखा दिला असून गुरुवारी रात्री भिजलेला कापूस पुन्हा शुक्रवारी भिजला त्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढली आहे.
सोयगाव तालुक्यावर अवकाळी पावसाचे संकट कोसळले आहे.गुरुवारी रात्री अन शुक्रवारी दिवसा झालेल्या अवकाळी पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे