जव्हार प्रतिनिधी : सुनिल जाबर
आज जव्हार स्टेडियम येथे एकलव्य अथॅलेटिक्स क्लबमध्ये मॅरेथॉन व अथॅलेटिक्सच्या सरावासोबतच जव्हार तालुका तालुक्यातील विविध आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय लेव्हल पर्यंत खेळाडू म्हणून मजल मारलेल्या पालघर जिल्ह्यातील १५ आदिवासी मुलामुलींना सरावासाठी बुट नसल्याची व परिणामी बऱ्याच वेळा मुलामुलींना सराव करताना तसेच स्पर्धेत धावत असताना इजा होत असल्याची खंत प्रशिक्षक श्री. शंकर चौधरी सर यांनी पनवेल मॅरेथॉनमध्ये पनवेल येथे सिडको अग्निशमन सेवेत सेवा बजावत असणारे आदिवासी युवा श्री. सुरज पाटील सर यांना सांगितली असता त्यांनी नुकतीच MPSC मधून उप विभागीय जल संधारण अधिकारी गट अ पदी निवड झालेले व विद्यमान मुंबई महानगर पालिकेत जल अभियंता म्हणून कार्यरत असलेले आदिवासी युवा श्री. ओमकार खोरगडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी रनींगसाठी उपयुक्त बुट दिले तसेच सिडको अग्निशमन सेवेत कार्यरत असलेले श्री. सुरज पाटील सर यांनी टीशर्ट, सॅन्डो, तसेच रनिंग साठी उपयुक्त पॅन्ट हे साहित्य दिले. राष्ट्रीय खेळाडू म्हणून असलेल्या युवकांना शासकीय नोकरीतील संधी विषयी मार्गदर्शन करत ग्रामीण भागातून पुढे जात आपल्या आदिवासी समाजा सोबतच जिल्हाचे नाव उज्ज्वल करून भविष्यात देशासाठी खेळण्यासाठी शुभेच्छा देत यापुढे सुद्धा कोणतीही मदत व सहकार्य लागल्यास करण्याचे आश्वासन दिले.
मॅरेथॉन तसेच अथॅलेटिक्सची सराव करण्यासाठी उपयुक्त बुट - मोजे, सोबतच टीशर्ट-सॅन्डो, तसेच धावण्यासाठी उपयुक्त पॅन्ट (टाइटी) यांची उपलब्धता करून दिल्याबद्दल एकलव्य अथॅलेटिक्स क्लबचे प्रशिक्षक श्री. शंकर चौधरी सर यांनी सर्वांचे आभार वेक्त केले.या प्रसंगी आदिवासी समाजसेवक श्री.दीपक कोथे,वैभव बरफ,ओमकार खोरगडे साहेब, सुरज पाटील सर हे उपस्थित होते.