गंगाखेड प्रतिनिधी
महातपुरी जिल्हा परिषद मतदार संघातील दत्तोबा संस्थान दत्तवाडी येथील सार्वजनिक शौचालय बांधकामाची आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शुक्रवारी भेट देत पाहणी केली.
दत्तोबा संस्थानचे मठाधिपती ह भ प नागनाथ महाराज पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तोबा संस्थान येथील भाविकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली दत्तोबा संस्थानतील भक्त मंडळींनी केली होती. या मागणीची दखल घेत पंचायत समितीचे बिडिओ डॉ अंकुश चव्हाण यांनी ग्रामपंचायतला तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावर तात्काळ कार्यवाही होऊन ग्रामपंचायतचे सरपंच ,ग्रामसेवक यांनी या बांधकामात सुरुवात केली. शुक्रवारी सखाराम बोबडे पडेगावकर, शेषराव आव्हाड यांनी या बांधकामाची पाहणी केली. सार्वजनिक सप्ताह सुरू होण्यापूर्वी या शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे अशा सूचनाही दिल्या. नागनाथ महाराज पुरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले .सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या प्रयत्नातून तीन लाख वीस हजार रुपये ची तरतूद करण्यात आली. हे शौचालय होत असल्याने भाविकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.