लंपीच्या लसीकरण नंतरही लंपी बाधित बैलाचा मृत्यू
सोयगाव, दि.०६..लंपीच्या लसीकरण नंतरही सोयगाव तालुक्यात लंपिणे बाधित जनावरांच्या संख्येत वाढ होऊन मृत्यूची मालिका सुरूच आहे. गुरुवारी सायंकाळी निंबायती येथील शेतकरी ज्ञानेश्वर सांडू राठोड यांच्या बैलाचा लसीकरण झाल्यावरही बाधित झाल्याने मृत्य झाला आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागासमोर लसीकरण करूनही लंपीचे आव्हान कायम राहिले आहे..
निंबायती ता सीयगव येथे गुरुवारी सायंकाळी एका बैलाचा लंपी ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे सोयगाव तालुक्यात लंपीच्या प्रादुर्भावावर पशुसंवर्धन विभागाकडून कोणत्याही मार्गदर्शन सूचना न देता उपाय योजना साठी पशु संवर्धन विभाग कमी पडत आहे.जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सोयगाव तालुक्यासाठी लसींचा साठा पुरविण्यात येत नसल्याने पशुपालक चिंतेत आहे सोयगाव तालुक्यात चर्मरोग प्रादुर्भाव वाढता होऊन सुद्धा पशुसंवर्धन विभागाकडून नियमित लसीकरण होत नसल्याचे पशुपालकांनी सांगितले दरम्यान कमो मनुष्यबळ असल्याचे कारण पशुसंवर्धन विभागाकडून पुढे केले जात आहे,प्रत्यक्षात मात्र जरंडी पशु वैद्यकीय दवाखान्यचा पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही..दरम्यान याप्रकरणी निंबायती येथे शेतकऱ्यांनी काळजी घेऊन या मृत बैलाला अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार केले...