Type Here to Get Search Results !

एकलव्य ॲथलेटिक्स क्लब जव्हार’ ला ‘पनवेल मॅरेथॉन – २०२२’ मध्ये घवघवीत यश




एकलव्य ॲथलेटिक्स क्लब जव्हार’ ला ‘पनवेल मॅरेथॉन – २०२२’ मध्ये घवघवीत यश

पालघर प्रतिनिधी – दिनेश आंबेकर

जव्हार : ‘कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी’ येथे ‘पनवेल मॅरेथॉन – २०२२’ पार पडली प्रशिक्षक शंकर चौधरी यांच्या प्रशिक्षणातून घडत आहेत भविष्यातले ॲथलेटिक्स विश्वातले चमकते सितारे जव्हार तालुक्यातील बोराळे गावचे तसेच शासकीय आश्रमशाळा विनवळ मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अतुल रामू चिभडे याला १७ वर्ष वयोगटातील ३ कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच कविता दांगटे हिला खुल्या गटात ५ किमी मॅरेथॉन मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असून हे दोन्ही विद्यार्थी हे ‘आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय जव्हार’ मधील ‘विनवळ आश्रमशाळेत’ शिक्षण घेत असून सोबतच जव्हार येथे क्रीडा शिक्षक तसेच एकलव्य ॲथलेटिक्स क्लब जव्हारचे प्रशिक्षक शंकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अथॅलेटिक्सचे प्रशिक्षण घेत आहेत.

याप्रसंगी पनवेल येथे सिडको अग्निशमन सेवेत कार्यरत असलेले सुरज पाटील उपस्थित होते. या सर्व यशामागे खरं पाठबळ क्रीडा प्रशिक्षण शंकर चौधरी यांचा आहे. त्यांनी मोफत प्रशिक्षणा सोबतच स्वखर्चातून राज्यात अनेक ठिकाणी मॅरेथॉनसाठी घेऊन जाण्यापासून त्यांची सर्व काळजी घेतात. सदर स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातुन व गावातून त्यांचे व त्याचे प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad