माहूर तालूका प्रतिनिधी :( जितेंद्र चव्हाण )
दिनांक ८ ऑक्टोंबर शनिवारी रोजी गट ग्रामपंचायत लोकरवाडी पैकी मनीरामथड येथे सिमेंट रस्त्याचे काम सुरू होत असल्याने वस्तीतील नागरिक आनंदोत्सव साजरा करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की, मा. खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या निधीतून शिवसेना जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांनी अत्याधिक परिश्रम घेऊन पंचवीस लाखाची निधी आणले.
या निधीतून आज मनीरामथड येथे वस्तीत सिमेंट रस्त्याच्या कामाला श्री गणेशा करून सुरुवात केली.
यावेळी मा. ज्योतिबा दादा खराटे यांनी श्री फळ फोडून कामाला प्रारंभ करून आपले मनोगत मांडताना आमच्याकडे कोणता पद असो किंवा नसो आम्ही अन्याया विरुद्ध कायम लढू असे पुढील कामाला सुरुवात करण्यात आले. यावेळी उपस्थित
कातले सर मा. सभापती,
उमेश जाधव मा. उपसभापती,मा. सरपंच मनोहर सिडाम,
मा. उपसरपंच पुरण राठोड,
रमेश मडावी,शेंकना गुंडावार,
दत्ता कारंजेवार, आरिफ भाई बानानी, प्रविण जाधव, सलीम भाई, प्रेम गंधे, विजय गंधे, प्रशांत गंधे, राजू ठोसर, दिलीप ठोसर, संतोष ठोसर, रामकृष्ण सिडाम, रत्नाकर घोडे, रुपेश राठोड, सुनिल अत्राम, शेखर गंधे, विक्की राठोड व गावातील नागरिक उपस्थित होते.