माहूर तालुका प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण यांचेकडून)
लोकरवाडी/ मनिरामथड गट ग्राम पंचायतीच्या निकाल १९ सप्टेंबर रोजी नुकताच लागल्याने सरपंच हे पद थेट जनतेतून निवड करण्यात आली.मात्र
सर्वांचे लक्ष लागलेल्या उपसरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार पैकी सीमाबाई उकंडराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली..तर
दिनांक ६ ऑक्टोंबर गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती.या कार्यक्रम प्रसंगी विस्तार अधिकारी एल बी जाधव, ग्रामसेवक आर बी सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामनिर्देशन छाननी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत सीमाबाई उकंडराव जाधव असे एकच नाव नोंदणी आल्याने छाननीप्रमाने वैद्य धरून सरपंच रामदास झलपत धूर्वे यांच्या अध्यक्षखाली सौ. सीमाबाई उकंडराव जाधव यांची उपसरपंच पदासाठी बीनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सदस्य भारतीबाई अशोक पवार, पंचीबाई अत्राम, सुनील अत्राम,मीराबाई अशोक गेडाम, सोनाबाई गणेश आडे तर या कार्यक्रमाला (तंटामुक्ती अध्यक्ष) सुभाष आडे, किसन पवार,वासुदेव पवार, डॉ. मधुकर जाधव, गोविंद पवार,माणिक गेडाम, उकंडराव जाधव(सावरखेड सेवा सहकारी सोसायटी चेअरमन) भिकू जाधव, माणिक आत्राम,सुरेश रुपसिंग राठोड,दिनेश आडे, सुदाम जाधव(माजी उपसरपंच), अशोक गेडाम, उकंडराव राठोड,किसन राठोड,रमेश राठोड,इंदल आडे,कुंदन राठोड, अशोक राठोड(डीलर) अशोक पवार,व गावातील नागरिक उपस्थिती होते.
कायदा सुव्यवस्था राहावी म्हणून सिंदखेड येथील पोलिस प्रशासन पठाण सोबत एक होम गार्ड आपले कर्तव्य बजावले.