जव्हार प्रतिनिधी : सुनिल जाबर
मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम मध्ये मराठी जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे १२० गरजू मुला मुलींना गणवेश , टी शर्ट , बूट यांचे वाटप करण्यात आले.मोखाडा तालुका हा पूर्ण पणे आदिवासी म्हणून ओळखलं जाणारा असून येथील सर्व पालकांची आर्थिक परिस्थिती बळकट असल्यामुळे आपल्या मुलांना सर्व साहित्य पुरवणे पालका कडून होत नाही.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोचाळे येथे १ वी ते ८ वी चे वर्ग असून येथील शाळेचा पूर्ण पट १२० एवढा आहे .विशेष म्हणजे या शाळेत सर्व मुले हे गावातले गावात शिक्षण घेत आहेत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.
या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोचाळे शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर फसाळे सर,तसेच जोशी सर आणि ठोंबरे सर,वाघ सर उपस्थित होते.