जव्हार प्रतिनिधी : सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाणी व रीठीपाडा या गावपाड्यांना दरवर्षी प्रमाणे डिसेंबर अखेर पासून दोन्ही पाड्यातील विहरीतील पाण्याचा पुरवठा कमी होताना दिसून येतो .या गावातील ग्रामस्थांना दिवाळी संपली की येथील महिलांना पाण्याचा प्रश्न पडतो की अजूनपर्यंत किती दिवस पाणी पुरेल ,येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कडे वेळोवेळी पाणी टंचाई ही समस्या त्यांचे लक्षात आणून देत असे प्रत्येक ग्रामसभेत हा प्रश्न येथील ग्रामस्थ मांडतात .परंतु ते फक्त आश्वासन देतात की होईल असे आणि परत पाणीटंचाई चालू झाली की टँकर सुरू करतात.परंतु येथील ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की टँकर चे पाणी या गावासाठी पुरेपूर येत नसून या वर्षी तरी पाणी टंचाई आमची कायमची दूर होईल का अशा प्रश्न पडलेला आहे.
एकीकडे भारत स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली असून सागपाणी व रीठीपाडा या गावातील अती मूलभूत गरजा म्हणजेच पाणी टंचाई ही समस्या अजूनर्यंत दूर झालेली नसून येथील ग्रामस्थ हे आता खूपच हैराण झाले आहेत.तर आता ऑक्टोबर महिना संपायला आला असून अजूनर्यंत पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोणतेही काम दिसून येत नाही असे येथील ग्रामस्थाचे म्हणणे आहे.तर अजून हि वेळ गेलेली नसून एखादी मोठी योजना राबवून या दोन पाड्यांचा पाणीटंचाई ही समस्या कायमची दूर कशी करता येईल. या कडे ,सरपंच ,ग्रामसेवक व प्रशासनाने या कडे दुर्लक्ष न करता तुम्ही या दोन गावांना प्रत्यक्ष भेट देवून पुढचे कामाचे नियोजन करून लवकरात लवकर सुरुवात करावी .
या प्रसंगी चर्चा करताना सागपाणी गावचे ग्रामस्थ चिंतामण मिरका,सखाराम बुधर,शांताराम बुधर,अरविंद बुधर,रमेश हलकारी,धर्मेश बुधर व रीठीपाडा गावचे ग्रामस्थ गुलाब बुधर,काशिनाथ बुधर,मिनेश भोवर,कपिल बुधर,लहू बुधर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.