Type Here to Get Search Results !

अर्धापूर तालुक्यातील कामठा येथील मटक्यावर कारवाई दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल




अर्धापूर तालुक्यातील कामठा येथील मटक्यावर कारवाई दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अर्धापूर-तालुक्यातील कामठा येथे मिलन डे,टाईम बाजार नावाचा मटका सुरू असल्याची गुप्त खबरा मार्फत माहिती दि.१० सोमवारी रोजी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली पोलिसांनी झाडा झडती घेतली असता मटका खेळत असतांना व खेळवितांना मटक्याचे साहित्य व नगदी मिळाल्याने दोघांना पकडून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोउनि प्रकाश पवार यांनी दिली आहे.
अर्धापूर तालुक्यातील कामठा येथे मिलन डे टाईम बाजार नावाचा मटका खेळत व खेळविला जात असल्याची माहिती गुप्त खबरा मार्फत स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली यात दोघेजण मिलन डे व टाईम बाजार नावाचा मटका खेळत व खेळीत असताना मिळून आल्याने पोउनि स्थानिक गुन्हा शाखा दत्तात्रय काळे यांच्या फिर्यादीवरून
 आरोपी संदीप सिंग महाराज रा.कासरखेडा, गंगाप्रसाद वंगलवार रा.वसरणी ता.जी नांदेड यांच्याकडून मिलन डे व टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळत व खेळीत असताना मटक्याचे साहित्य नगदी ५१६० रूपये मिळून आले म्हणून कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोउनि साईनास सुरवसे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad