Type Here to Get Search Results !

फुलसावंगी येथे विद्यार्थ्यांनी भरवली रस्त्यावर शाळा




फुलसावंगी येथे विद्यार्थ्यांनी भरवली रस्त्यावर शाळा

उशिरा पोहचलेल्या अधिकाऱ्यां वर पालकानी केला मनस्ताप व्यक्त




अधिकाऱ्यांच्या मध्यस्ती नंतर रस्ता केला रिकामा

आंदोलनाला यश दोन दोन शिक्षक नियुक्त

माहागाव प्रतिनिधी- संजय जाधव




येथील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्याच्या मागणी साठी आज 11 वाजता येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय,जि. प. प्राथमिक मराठी आणि उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांथी व पालकांनी चक्क रस्त्यावर शाळा भरवून जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.11 वाजे पासून पहिली ते 10 वी वर्गातील विद्यार्थी हे भर उन्हात बसून होते तर महागाव पंचायत समितीइ चे अधिकारी येथे चक्क 1 वाजता पोहचले त्यामुळे पालकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
उच्च प्राथमिक मराठी शाळे मध्ये ३०५ विद्यार्थी संख्या असुन १ते४ सेमी इंग्रजी व मराठी अशा एकुण ८ तुकड्या असुन मंजुर १२ सहाय्यक शिक्षक व १ उच्च श्रेणी मुख्याध्यापक कसे १३पदे मंजुर असुन आज रोजी फक्त ५ सहाय्यक शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये ८६० विद्यार्थी संख्या असुन १२ तुकड्या असुन येथे मंजुर पदे ३१ असुन आज रोजी ११ सहाय्यक शिक्षक १ उच्च श्रेणी मुख्याध्यापक व २ परिचर असे १४ लोक आहेत तर १७ पदे रिक्त आहेत. तसेच उच्च प्राथमिक उर्दु शाळे मध्ये ३२२ विद्यार्थी असुन ८ तुकड्या आहेत. येथेही १२ सहाय्यक शिक्षक तर १ उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद मंजुर असुन आज रोजी येथे ६ सहाय्यक शिक्षक कार्यरत असुन ६ पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यात सर्वात चांगली विद्यार्थी संख्या ही फुलसावंगी तील जिल्हा परिषद च्या तिन्ही शाळेत असताना ही केवळ प्रशासनाच्या उदासीन धोरणा मुळे ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थ्यांनचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने येत्या ०८ ऑक्टोबर पर्यंत येथील जिल्हा परिषद च्या तिन्ही शाळेची रिक्त पदे भरण्यात यावी अन्यथा गावातील सर्व पदाधिकारी, नागरिक व पालक विद्यार्थ्यां सह १०ऑक्टोबर रोजी फुलसावंगी येथील राष्ट्रीय महामार्गावर शाळा भरवतील असा इशारा दिला होता त्या प्रमाणे आज येथील तिन्ही शाळेच्या विद्यार्थी व पालकांनी येथील महामार्गावर शाळा भरवली त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक दो तीन तास विस्कळीत झाली होती.11 वाजे पासून पहिली ते 10 वी वर्गातील विद्यार्थी हे भर उन्हात बसून होते तर महागाव पंचायत समितीइ चे अधिकारी येथे चक्क 1 वाजता पोहचले त्यामुळे पालकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.पोलीस प्रशासन व पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या मनधरणी नंतर महामार्ग मोकळा करण्यात आला.मात्र शिक्षकांची आताच नियुक्ती करण्यात यावी यावर पालक अडले होते.शेवटी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळे मध्ये तातळीने दोन दोन शिक्षक नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती विस्तार अधिकारी पंचायत समिती महागाव यांनी दिली तसेच जिल्हा माध्यमिक विद्यालय बद्दल चर्चा सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad