Type Here to Get Search Results !

खर्राचे नाद.... अन् दोघांचे अपघात | माहुर तालुक्यातील असोली फाट्यावर दुपारी एसटी बस व दुचाकीची धडक झाली.




खर्राचे नाद.... अन् दोघांचे अपघात

माहूर तालुका प्रतिनिधी 

माहुर तालुक्यातील असोली फाट्यावर दुपारी एसटी बस व दुचाकीची धडक झाली.
त्यात यवतमाळ जिल्ह्यातील बोरी गोसाई येथील मासेमारीचा व्यवसाय करणारे मंगेश रमेश मेश्राम (वय १८ वर्षे ) व राजेश कांबळे ( वय २३ वर्षे) हे युवक गंभीर जखमी झाले.

सदरची घटना दि.१२ ऑक्टोंबर बुधवारला दुपारी ०३ वाजताचे सुमारास ही घटणा घडली आहे.
नेहमीप्रमाणे कासारपेठच्या तलावातून मासेमारी करून आलेले दोन्ही तरुण राष्ट्रीय महामार्गावर आसोली फाट्यावर थांबले होते. बाजूच्या टपरीवरून खर्रा घेवून निघतांना माहूर कडून किनवटकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बीड- किनवट एम. एच. २६ बी. एल. २०४७ या क्रमांकाची बसने त्यांना जोराची धडक दिली. त्यात दोघे जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणकुमार वाघमारे, डॉ.उदय काण्णव यांनी त्यांच्यावर उपचार केले. परंतु प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रवाना केल्याचे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जर का खर्रा खाण्याचे सवयच राहिली नसती तर कदाचित हे घटना घडलेच नसते असे लोकांकडून बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News