Type Here to Get Search Results !

अर्धापूर ( नांदेड ) : भरधाव ट्रकने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर ...




अर्धापूर ( नांदेड ) : भरधाव ट्रकने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर ...

अर्धापूर ( नांदेड) : भरधाव ट्रकने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३:३० वाजता पिंपळगाव महादेव पाटीजवळ घडली. सचिन संभाजी पल्लेवाड ( २३ ) असे मृताचे नाव आहे. तर शिवदास बालाजी वाघे ( २८, दोघे ही राहणार तुराटी ता.उमरी ) असे जखमी युवकाचे नाव आहे.
 भोकर ते नांदेड जात असतांना पिंपळगाव म.पाटीजवळ भरधाव वेगातील ट्रकने ( क्र.एम.एच.२६ ए.डी ०७१९ ) समोरील बाईकला जोरदार धडक दिली. यात सचिन पल्लेवाड आणि शिवदास वाघे हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना १०८ चे डॉ.आनंद शिंदे, चालक रणवीर लंगडे यांनी शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून सचिन यास मृत घोषित केले. तर गंभीर जखमी शिवदासवर उपचार सुरु आहेत. मृत सचिन भोकर येथे एका औषधी दुकानावर कामावर होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण व एक छोटा भाऊ असा परिवार आहे.

: ट्रक मोटरसायकल अपघातामुळे राष्ट्रीय मार्गावर बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी पो.नी अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी तय्यब अब्बास, संजय घोरपडे, अविनाश खरबे, कल्याण पांडे, महेंद्र डांगे,संदीप गायकवाड, बालाजी कोकाटे, सुनिल पाचपोळे,राजु धाडवे, मृत्युंजय दूत अजय देशमुख व महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News