Type Here to Get Search Results !

पालघर नगरपरिषदेवर १०० % टक्के शिवसेनेचे सभापती विराजमान.




पालघर नगरपरिषदेवर १०० % टक्के शिवसेनेचे सभापती विराजमान.

प्रतिनिधी - दिनेश आंबेकर

 पालघर- ( एच.लोखंडे ) सन २०१९ मध्ये झालेल्या, पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी नंतर ६ आॅक्टोंबर २०२२ रोजी पालघर नगरपरिषदेच्या विषय समित्या व स्थायी समिती निवडणूका, मा. पीठासीन अधिकारी श्री. धनाजी तोरस्कर - उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या देखरेखीखाली पार पडले.

       पालघत नगर परिषदेच्या सन २०२२ - २०२३ विषय समिती सभापती पदी १) श्री. राजेंद्र आत्माराम पाटील - सार्वजनिक बांधकाम समिती - सभापती, २) श्री. उत्तम मोरेश्वर घरत - पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती - सभापती, ३) श्री. तुषार दिलीप भानुशाली - स्वच्छता, वैद्यकीय आणी सार्वजनिक आरोग्य - सभापती, ४) श्री. अमोल प्रकाश पाटील - नियोजन व विकास समिती - सभापती, ५) श्रीमती. अनुजा अशोक तरे - महिला व बालकल्याण समिती - सभापती, ६) श्री. चंद्रशेखर गोपीनाथ वडे - शिक्षण, क्रिडा, सांस्कृतिक कार्य समिती - सभापती, या सर्व " सभापती " पदी शिवसेनेचे सभापती विराजमान झाले आहेत.तर डाॅ. सौ. उज्ज्वला केदार काळे - नगराध्यक्षा, श्री. उत्तम मोरेश्वर घरत - उपनगराध्यक्ष, श्री. राजेंद्र आत्माराम पाटील - सदस्य, श्री. चंद्रशेखर गोपीनाथ वडे - सदस्य, 

श्री. तुषार दिलीप भानुशाली - सदस्य, श्री. अमोल प्रकाश पाटील - सदस्य, श्रीमती. अनुजा अशोक तरे - सदस्या, श्री. कैलास सुक-या म्हात्रे सदस्य, श्री. सुभाष विष्णू पाटील सदस्य, श्रीमती लक्ष्मीदेवी धनराजसिंह हजारी सदस्या. यांची निवड करण्यात आलेले आहे. 

      पालघर नगरपरिषदेच्या सहा पैकी सहा, विषय समित्यांवर शिवसेनेचे सभापती विराजमान होऊन. पालघर नगरपरिषदेवर भगवा फडकला आहे. या प्रसंगी श्री. केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक, श्री. केतन पाटील - शिवसेना पालघर लोकसभा संपर्क प्रमुख, श्री. विकास मोरे - शिवसेना पालघर तालुका प्रमुख, श्री. भूषण संखे - शिवसेना पालघर शहर प्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad