तर एक जण गंभीर जखमी असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले
लोहा प्रतिनिधी :- विठ्ठल कतरे पांगरेकर
लोहा तालुक्यातील धावरी तांडा शिवारातील या बाबत सविस्तर वृत्त असे कि तीन जणांचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.१८ रोजी दुपारी तीन ते चार च्या दरम्यान लोहा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह हवा व पाऊस सुरुवात झाली यात शेतात ऊस तोड काम करण्यासाठी गेलेले चार कामगार पाऊस पडत असल्याने झाडाचा आसरा घेत झाडाखाली उभे राहिले तेव्हा वीज पडली व तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर एका पूजा डुबुकवाड वय १८ वर्ष, राहणार पानभोसी हे
पुढील उपचारास लोहा येथून नांदेड येथे पाठवले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत व्यक्तींचे नावे पुढील प्रमाणे माधव डुबुकवाड वय ४२ वर्ष,राहणार पानभोसी पोचीराम शामराव गायकवाड वय 40 वर्ष व रूपाली पोचीराम गायकवाड वय 18 वर्ष हे मयत पेठ पिंपळगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे घटना स्थळावर लोहा पोलीस निरीक्षक संतोष तांबे उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात,
उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, प्रार्चाय राजेंद्र भोसीकर, शिवाभाऊ नरंगले,नरेंद्र गायकवाड,धावरीचे सरपंच,रयवाडीचे पोलिस पाटील वैजनाथ पाचांळ पानभोसीचे पोलिस पाटील ईसाक शेख डि एस बी गिरी व गावातील नागरिक उपस्थित झाली असल्याची माहिती समोर आली आहे.