Type Here to Get Search Results !

जव्हार तालुक्यातील आकरे ग्रामपंचायत मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी.




जव्हार तालुक्यातील आकरे ग्रामपंचायत मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी.

जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर

 जव्हार तालुक्यामध्ये 47 ग्रामपंचायतींसह तसेच 2 ग्रामदान मंडळे आहेत, त्यांची मुदत संपली नसल्याने त्या ग्रामदान मंडळाच्या निवडणुकांना आणखी कालावधी आहे.तर वावर - वांगणी ह्या ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाल्याने तसेच दि - 17 ला मतमोजणी झाल्यावर या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस- 13. भाजप -12, शिवसेना -6, सिपीएम -5, जिजाऊ - 6,बहुजन विकास आघाडी -4, शिंदे गट -2 तसेच या प्रकारे उमेदवार निवडून आलेत.

   तसेच आकरे ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्री - धिरज बंडू घूमल हे वार्ड क्र - 3 मधून 222 मताने दणदणीत विजयी मिळवून आपले उमेदवार सरपंच पद मिळवले आहे.
तसेच जव्हार शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.विजयी उमेदवार बाहेर पडताच त्यांच्या समर्थकांकडून गुलाल उधळत विजयाच्या घोषणा देत जल्लोष साजरा केला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad