Type Here to Get Search Results !

स्पार्क फाऊंडेशन ठाणे यांच्याकडून कोचाळे शाळेत इमारत दुरुस्तीचे काम पूर्ण




स्पार्क फाऊंडेशन ठाणे यांच्याकडून कोचाळे शाळेत इमारत दुरुस्तीचे काम पूर्ण

पालघर जिल्हा प्रतिनिधी: सुनिल जाबर

                        मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथील इमारतीवरील पत्रे दोन वर्षा पूर्वीच्या वादळात उडाल्यामुळे इमारत पावसाळ्यात लिकेज व्हायची आणि विद्यार्थ्यांना बसण्याची गैरसोय व्हायची. शाळेत सद्यस्थितीत आठ इयत्ता ,चार शिक्षक आणि चार वर्गखोल्या पैकी एक नादुरुस्त आसल्याची स्पार्क फाऊंडेशन च्यां निदर्शनास येताच विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेवून सदर इमारत तात्काळ दुरुस्त करून विद्यार्थी व शाळेची अडचण दूर केली . तसेच शाळेसाठी भविष्यातील आवश्यक भौतिक सुविधा ही पुरविण्याचे आश्वासन दिले .

      सदर इमारत पूर्णत्वाचा पाहणी करण्यासाठी आलेले स्पार्क फाऊंडेशन चे अध्यक्ष आशिष सर , मकरंद दिक्षित सर आणि नितीन पिठोले यांचे कोचाळे गावाचे ग्रामस्थ आणि विद्यार्थी यानी स्वागत केले सदर कार्यक्रमांसाठी गावाचे जेष्ठ नागरिक श्री. पुरुषोत्तम शिंगवे , सीताराम फसाळे, प्रकाश फसाळे, तरुण वर्ग , शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिनकर फसाळे व उपशिक्षक राजाराम जोशी सर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad