छायाचित्रात जरंडी नदीला आलेला पूर...
सोयगाव, दि.१८..सोयगावसह मंगळवारी पहाटे चार वाजता झालेल्या दोन तासांच्या पावसात चारही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून जरंडी मंडळात एकाच दिवसात दोनवेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर नैसर्गिक संकटाचे सावट पसरले आहे...
सोयगाव तालुक्यात मंगळवारी पहाटे चार वाजेपासून झालेल्या संततधार पावसाची चारही मंडळात अतिवृष्टीच्या नोंद झाली आहे.बनोटी मंडळात सर्वाधिक ७३ मी मी पावसाची नोंद झाली आहे दरम्यान मंगळवारी पहाटे व दुपारी तीन नंतर पुन्हा जरंडी मंडळाला मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने जरंडी मंडळात एकाच दिवसात दोन वेळा अतिवृष्टीच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
परतीच्या पावसाने सोयगाव तालुक्यात धुमशान सुरू केली आहे त्यामुळे कपाशी पिकांना सड रोगाची लागण झाली आहे यामध्ये कोरडवाहू भागातील कपाशी पिकांच्या कैऱ्या सडत असून लागलेला बागायती क्षेत्राचा कापूस भिजला आहे त्यामुळे या कापसाच्या झाडावरच वाती झाल्या आहे परतीच्या पावसाने सीयगव तालुक्यात सर्वाधिक फटका कपाशी पिकांना बसला आहे तर सोयाबीन पिके शेतातच कुजले आहे.दरम्यान सोयगाव तालुक्यात आता तरी नुकसानीची पंचनामे होतील का असा प्रश्न शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे...
परतीच्या पावसाचा सोयगाव तालुक्यात कहर झाला आहे सोमवारी दुपारपासून सुरू झालेंक्या पावसाने सोमवारी सायंकाळी उसंत घेऊन पुन्हा मंगळवारी पहाटे चार वाजेपासून जोरदार बॅटिंग केली जरंडी मंडळात एकाच दिवसात दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे जरंडीचे धिंगापुर, गारगोटी ही धरणे ओव्हरफ्लो झाली असून जरंडीच्या नदीला मोठा पूर आला होता या पुरात मंगळवारी सायंकाळी शेतातून परतणारे मजूर अडकले होते...
सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसाने कपाशी पिके काळवंडली असून पिकांच्या कैऱ्याना सड रोगाची लागण झाली आहे...जरंडी मंडळात कपाशी,मका,सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे तर जरंडी परिसरात दहा गावातील कपाशी पिकांना जलसमाधी मिळाली आहे.जरंडीत मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तासभर पाऊस झाला त्यामुळे जरंडीच्या खडकी नदीला सायंकाळी पूर आला होता...