भातकुली प्रतिनिधी - वैभव भुजाडे
नागपूर येथे संपन्न झालेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर. MINISTRY OF CULTURE भारत सरकार साहित्य गुरू अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये मरी आईचा गाडा या नाटकाचे सादरकर्ते अमरावती मधील नामांकित गंधर्व बहुउद्देशीय संस्था यांनी बाजी मारली.त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.त्याचप्रमाणे वैयक्तिक सात पारितोषिक सुद्धा या नाटक मधील कलाकारांना मिळाले आहेत.
१) उत्कृष्ट लेखन प्रथम - आशिष टिळक
२) उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम - अभिजीत झाडे
३) उत्कृष्ट नेपथ्य प्रथम - स्नेहशील गणविर
४) उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम - स्नेहशील गणविर
५) उत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम - अभिषेक बेल्लरवार
६) उत्कृष्ट पुरुष अभिनय प्रथम - विवेक वाकोडे
७) उत्कृष्ट स्री अभिनय प्रथम - राजनंदिनी श्रीनाथ
वैयक्तिक सात पारितोषिके तेही प्रथम आणि सांघिक पण प्रथम असे एकूण आठ पारितोषिके घेऊन गंधर्व बहुउद्देशीय संस्थेने दणदणीत विजय मिळवला.
या संस्थेचे अध्यक्ष दीपक सुभाष नांदगावकर यांनी 91 इंडिया न्यूज नेटवर्क सोबत बोलताना सांगितले की, त्यांनी व त्यांच्या टीमने सर्वांनी मिळून यासाठी खूप जास्त परिश्रम घेतले होते.रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून हि सर्व तैयारी या कलाकारांनी केली.या सर्वांचं श्रेय त्यांनी आपल्या या मरी आईचा गाडा च्या टीमला दिले.तसेच अमरावती मधील नागरिकांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत होता असे पण बोलले.
संस्थेचा आणि टीम चा प्रवास हा आणखी दूरपर्यंत जाणार आणि यशाचं शिखर ही मांडली गाठणार अशी हमी सुद्धा त्यांनी दिली.