पालघर जिल्हा प्रतिनिधी: सुनिल जाबर
मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावातील समाजिक क्षेत्रात एक नाव लौकिक असणारे समाजसेवक म्हणून सचिन पाटील यांच्या कडे पाहिले जाते एक उच्च शिक्षित विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे गेली ८ वर्षे सचिन पाटील यांनी समाजातील सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात काम केले आहे, महामानव बुद्ध,कबीर,शिव,फुले,शाहू,आंबेडकर,बिरसा,राघोजी या महापुरषांच्या विचारधारेवर काम करणारे एक पुरोगामी विचारांचा त्यांचा अभ्यास व समाजिक संघटनानं च्या मोठ्या पदा पर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत त्याच प्रमाणे दिल्ली,लखनऊ या ठिकाणी त्यांनी अधिवेशनात भाग घेऊन भारताच्या इतिहासावर सशोधन वर काम केल आहे.
त्यांची समाजिक व राजकीय दूरदृष्टी अंत्यन्त हुशारीची आहे नेहमी जनसमान्य जनतेचा विचार करणारे व आदिवासी,बहुजन समाजाचा बुलंद आवाज एक आंबेडकरी विचारवंत म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते त्यांच्या या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षा ची नजर ही त्यांच्या उमेदवारी कडे आहे त्यांनी जिजाऊ ग्रामविकास पॅनल मधून आपला पाठींबा देत खोडाळा वार्ड क्रमांक २ मधून ते ग्रामपंचात निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचा हा एक समाजिक क्षेत्रातील लढा त्यांना आता येणाऱ्या १६ आक्टोंबर या तारखेला किती जन मत देणार व ते निवडून येणार अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामान्य जनतेला लागली आहे.