पालघर जिल्हा प्रतिनिधी: सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील एवघ्या ३० किलोमिटर अंतरावर असणारी रूईघर बोपदरी ग्रामपंचायत मधील माजी सरपंच श्री सुनिल जाबर व सोबत इतर कार्यकर्ते यांनी आज मा.श्री. निलेशजी भगवान सांबरे साहेब यांचे विचार व समाजकार्य बघून विक्रमगड जिजाऊ संघटना महाराष्ट्र मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
त्यांची सामाजिक व राजकीय दूरदृष्टी अत्यंत हुशारीची आहे.नेहमी जनसामान्य जनतेचा विचार करणारे एक समाजसेवक म्हणून सुनिल जाबर यांच्याकडे पाहिले जाते.एक उच्च शिक्षित विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे.गेली ५ वर्ष सुनिल जाबर यांनी समाजातील सर्व सामान्य जनतेचा न्याय देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात काम केले आहे.
या प्रसंगी विक्रमगड उपनराध्यक्ष श्री .महेंद्र पाटील साहेब , व जिजाऊ संघटना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख.श्री.रवींद्र खुताडे साहेब,सुजित भानुशाली साहेब आणि तालुका प्रमुख श्री.मधुकर पवार साहेब, रमिला जाबर ,विनायक जाबर,संदेश जाबर,रामदास गरेल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.