उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ईसापुर गावामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि सम्राट अशोक विजयादशमी उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ईसापुर येथील सम्यक बुद्ध टेकडीवर डॉ. बाबसाहेब आंबेडकर येथून 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण ऊपासक कैलास मोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा टाकळी येथील सरपंच सौ उज्वला प्रभाकर हाके ऊपसरपंच दिलीप जाधव पोलीस पाटील संध्या मारकवार सामाजिक कार्यकर्ते नितीन पांडे राजु मारकवार संजय पालतीया हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी रमामाता महिला मंडळाच्या वतीने ध्वज गीत सादर करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. तर सायंकाळी ३ वा. भव्य मिरवणुक काढून उत्सव सोहळा साजरा करण्यात आला
मिरवणुकीमध्ये असंख्या बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करन्यात आले कार्यक्रमाचे आयोजन 66 वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्सव ईसापुर येथील व पिंपळवाडी येथील सर्वांच्या सहकार्या च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भुतडा महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार नामदेव ससाने फुलसावंगी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पांडे, योगेश वाजपेयी, गोरसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पालतिया याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले यावेळी गावातील अर्जुन राठोड, ग्रामपंचायत सदस्य संदेश मोरे, आशिष पांडे शेकुराव रतनवार विनोद मोरे ह, भ, प, दत्ता महाराज ,प्रवीण जाधव ,वरूल जाधव, विलास चव्हाण ,अनंता मारकवार, दिलीप फुफरे, राम लामटिळे, प्रकाश चव्हाण, भिमसिंग राठोड अमन राटोड व गावातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते