प्रतिनिधी – दिनेश आंबेकर
विक्रमगड राज्य निवडणूक आयोगाच्या सार्वत्रिक निवडणुका मध्ये विक्रमगड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी २०० तर सदस्य पदासाठी ८१८ उमेदवार रिंगणात होते.यामध्ये ५९ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते दरम्यान सोमवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा पक्षाला ९, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ६, शिंदे गट ६ , ठाकरे गट ४, जिजाऊ संघटना ६, सीपीएम २, अपक्ष २, यांना जागा मिळाल्या आहेत. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली या मतमोजणीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.
या झालेल्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांना अशी अपेक्षा होती. ती सर्वांची अपेक्षा भंग होऊन सर्वच पक्षांना आपली ताकद अजमावता आली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादी दोन नंबरचा पक्ष ठरला. जिजाऊ संघटनेने आपले चांगले यश संपादन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे आपले सदस्य निवडून आणलेले आहेत.