माढा पंढरपूर मतदार संघातील शेवते,पेहे रस्ता तात्काळ दुरूस्त करा अन्यथा आ.बबनदादा शिंदे च्या घरासमोर शिमगा आंदोलन करणार माऊली हळणवर
माढा मतदारसंघातील शेवते,पेहे हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या भागात मोठ्या प्रमाणात खडी क्रेशर असल्यामुळे अवजड व अवैद्य वाहतूक होत असते त्यामुळे हा रस्ता प्रचंड खड्डे पडून खराब झालेला आहे. या भागाचे आमदार बबनदादा शिंदे विकासाच्या पोकळ गप्पा मारत असून या रस्त्याला आजपर्यंत कुठलाही निधी त्यांनी दिला नाही किंवा हा प्रश्न विधानसभेमध्ये सुद्धा मांडला नाही त्यामुळे तातडीने या भागातील अवजड वाहतूक बंद करावी व हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून किंवा पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून तयार करून मिळावा अन्यथा आम्ही दिवाळीमध्ये बबन दादा शिंदे यांच्या घरासमोर शिमगा आंदोलन करू असा इशारा सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी माऊली हळणवर ,तानाजी बागल ,सचिन पाटील ,नितीन बागल, विश्रांती भुसनर, सचिन आटकळे यांच्यासह शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
91 इंडिया न्यूज साठी दिनेश खंडेलवाल पंढरपूर