Type Here to Get Search Results !

मुळावा प्रभाग समन्वयक माधुरी दळवी यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सत्कार




मुळावा प्रभाग समन्वयक माधुरी दळवी यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सत्कार

 उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव 




 उमरखेड येथे जिल्हास्तरीय पार्वती कला प्रदर्शनी चे आयोजन 




 शितल सखी मंच च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना गृह उद्योग बाबत प्रशिक्षण देवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी, त्यांच्या कला गुणांना व्यवसायीक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महिलांनी बनविलेले आकर्षक आकाश कंदील,फुलदानी, परिक्षा साठी लागणारे पॅड, दीपावली साठी लागणारे सजावटीचे साहित्य, खाद्य पदार्थ,पापड,लोनचे ईत्यादी साहित्याची दिनांक १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२२ जिल्हास्तरीय पार्वती कला प्रदर्शनी व विक्री चे आयोजन राजस्थानी भवन वरचा हाॅल, महागाव रोड उमरखेड येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आले होते जास्तीत जास्त नागरिकांनी, सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर व महिलांनी प्रदर्शनी ला भेट देवून ग्रामीण रोजगाराला चालना देण्यात आली पार्वती ग्रुप उमरखेड च्या अध्यक्ष रूपाली शिरडकर यांनी केले.




शितल सखी मंच हे महिलांनी महिला साठी बनविलेले व्यासपीठ आहे आणि ते शितल लढ्ढा रिसर्च सोसायटी आणि पार्वती ग्रुप उमरखेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये ग्रामीण जीवनातील अभियाना अंतर्गत उमेद चे मुळावा प्रभाग समन्वय माधुरी दळवी यांनी मुळावा प्रभागाचे नियोजन चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांच उमरखेड येथील गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले या कला प्रदर्शनीला महागाव उमरखेड महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार नामदेव ससाने माजी आमदार विजयरावजी खडसे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदेव सरकर माजी बांधकाम सभापती तातू भाऊ देशमुख उमेद तालुका व्यवस्थापक रामदास इटकरे पंचायत समिती सदस्य रक्षा माने यांनी भेट दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad