सोयगाव, दि.१५..शेती क्षेत्रात मोकाट वानराने कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांना शेती बाहेर पिटाळून लावल्याने शनिवारी दुपारच्या आत शेती शिवारे सुनसान झाल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला दरम्यान मोकाट धुमाकूळ घालणाऱ्या या वानराने घोसला सह निमखेडी, नांदगाव तांडा आदी परिसरात शनिवारी धुमाकूळ घातला होता. सोयगाव वनविभागाच्या वतीने दिवसभर या वानरला जेरबंद करण्यासाठी पाठलाग करण्यात आला, परंतु वनविभागाला या मुक्त संचार करणाऱ्या वानराने हातावर तुरी दिल्या होत्या आठवडाभरापासून घोसला शेती शिवारात मुक्त वानर धुमाकूळ घालत आहे.मजुरांवर हल्ले चढवून झाडाला टांगलेली मजुरांची न्याहारी पळवून नेण्याचा प्रकार या मोकाट वानरा कडून करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी या मोकाट वानराकडून घोसला शिवारातील कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांमध्ये या मोकाट वानराने दहशत पसरवून मजुरांमध्ये भीती पसरविली होती, त्यामुळे घोसला शिवारातील कापूस वेचणी करणारे मजूर दुपार पूर्वीच घराकडे आली होती दुपारी नंतर या मोकाट वानराने निमखेडी शिवारात मुक्काम हकविल्याने वनविभागाच्या हाती हे वानर आले नव्हते,आठवडाभरापासून हे वानर या परिसरात उच्छाद करत आहे त्यामुळे भीतीपोटी मजुरांमध्ये दहशत पसरली आहे.
या मोकाट वानरच्या दहशत मुळे घोसला शिवारात कापूस वेचणी रखडली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचणीचे कामे अर्धवट राहिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आधीच भाव नाही त्यातच कापूस शेतात
आधीच कपाशीला कवडीमोल भाव मिळत असून त्यातच या वानरच्या धुमाकूळ मुळे शेतकऱ्यांचा कापूस शेतातच आहे या मोकाट वानरच्या दहशत मुळे कपाशी वेचणी ठप्प झालेली आहे वनविभागाच्या वतीने या मोकाट वानर चा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.