Type Here to Get Search Results !

पोलीस स्टेशन बिटरगाव ची धडक कार्यवाही शेतात गांज्याची लागवड करणारे आरोपीला ठोकल्या बेडया तब्बल १६,२०,००० / रू चा माल जप्त ।




पोलीस स्टेशन बिटरगाव ची धडक कार्यवाही शेतात गांज्याची लागवड करणारे आरोपीला ठोकल्या बेडया तब्बल १६,२०,००० / रू चा माल जप्त

        
उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव 

 बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संतोष वाडी येथे
दि.१५/१०/२०२२ रोजी मा.प्रदिप पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यानी माहीती मिळाली कि . आरोपी १) आनंदाराव गोवर्धन जाधव २) उल्हास रतन जाधव दोन्ही रा. संतोषवाडी (निगंणुर) ता. उमरखेड यानी त्यांचे शेतामध्ये अवैधरत्यिा गांज्या वनस्पतीची लागवड केलेली आहे. अश्या खबरेवरून सदर ख़बरेची वरीष्ठांणा माहीती देवुन कार्यवाहीची पुर्ण तयारी करून कार्यवाही पथकासह आरोपी यांचे शेतात संतोषवाडी येथे जावुन कार्यवाही केली असता दोन्ही आरोपी शेतात मिळुन आले. शेतीची पाहाणी केली असता शेतातध्ये तुर व कापसाची लागवड करून शेतामध्ये तुर व कापसाचे मध्ये गांज्या लागवड केल्याचे दिसुन आले. सदर झाडांचा पचासमक्ष पचनामा केला पचंनामा करून दोन्ही आरोपी चे शेतातील पोलीस स्टॉफचे मदतिने २७७ गांज्याची झाडे वजन २६६ किलो किमंत १६,२०००० रू करून पंचासमक्ष शिल करण्यात आले. करून माल जप्त केला. पोलीस स्टेशन बिटरगांव येथे पोउपनि कपील म्हस्के यांचे फिर्याद वरून अप. न. २८५ / २०२२ कलम २० एन.डी.पी.सी अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपी यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. सदर ची कार्यवाही ही मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ. मा. प्रदिप पाडावी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनामध्ये ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस, नायबतहसीलदार वैभव विठठल पवार, पोउपनि कपील म्हस्के, पोना गजानन खरात, रवि गिते, मोहन चाटे, विध्या राठोड पोकॉ सतिष चव्हाण, दत्ता कुसराम, निलेश भालेराव, मोहसीन पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील स.फौ. रवि मोहन आडे पोलीस स्टेशन महागाव चे पोहवा मुन्ना आडे मोजमाप अधिकारी शंकर हरणे, व उमरखेड येथील आरसीपी पथक होमगार्ड चंद्रमणी वाढवे, जिवन महाजन यानी केली. पुढील तपास हे वरीष्ठांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News