Type Here to Get Search Results !

धनगर समाजातील नेते मंडळी नी एकत्र येऊन सरकार वर दबाव आणुन धनगर व तत्सम जमाती च्या आरक्षणाची अमंल बजावणी करून घ्यावी :धनगर व तत्सम जमातीचे नेते मा.भिमराव भुसनर पाटील




धनगर समाजातील नेते मंडळी नी एकत्र येऊन सरकार वर दबाव आणुन धनगर व तत्सम जमाती च्या आरक्षणाची अमंल बजावणी करून घ्यावी :धनगर व तत्सम जमातीचे नेते मा.भिमराव भुसनर पाटील

महाराष्ट्रातील धनगर व तत्सम जमाती ना आरक्षणाची अमंलबजावणी करण्यात यावी म्हणून अनेक राजकीय नेते मंडळींनी व संघटनेचे नेते मंडळी च्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आली विविध ठिकाणी मोर्चे काढले गेले मध्यतंरीच्या काळात नेते मा.उत्तमराव जानकर साहेब व आमदार गोपीचंद पड्ळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मेळावे घेतले होते. तेव्हा पासून समाज बांधवांना अशा लागुन राहिल्या आहेत.आपल्या साजातील जेष्ठ नेते खा.विकास महात्मे साहेब, मा.मंत्री महादेव जानकर साहेब, मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे साहेब, मा.आ.रामहरी रूपनवर साहेब, मा.आ.अनंतराव पाटील साहेब, मा.आ.रामभाऊ वडकुते साहेब, मा.मंत्री आण्णा साहेब डांगे, आमदार राम शिंदे साहेब, मा.मंत्री दत्ता मामा भरणे साहेब, मा.आ.नारायण आबा पाटील, मा.आ.हरिभाऊ बदे साहेब, मा.विश्वास नाना देवकते पाटील, मा.डाॅ.बाबासाहेब देशमुख या प्रमुख नेते मंडळीनी एकत्र बसुन नियोजन करावे.आणि समाज हितासाठी कमिटी तयार करून मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब यांना भेटुन सविस्तर चर्चा करून अंमल बजावणी साठी सर्वांनी ठामपणे भुमिका घेतली तरचं न्याय मिळेल. कारण महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्ता भाजपची आहे. शिवाय सरकार सत्तेत आल्यावर पहिल्यांदा आरक्षणाचा अमंलबजावणी करतो असा शब्द सध्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामती येथील आंदोलन कार्यक्रमात दिला होता त्यांची आठवण करून देऊन आपल्या हक्काच्या आरक्षणाची अमंल बजावणी करून घ्यावी. समाजातील नेते मंडळी व विविध संघटनेचे नेते मंडळी एकत्र जर नाही आले तर किती ही संघर्ष केला तरी काही ही फायदा होणार नाही. जर आपल्या समाजातील नेते मंडळी च्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक निर्णय झालाचं तर शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडेल आणि समाजातील किती तरी मुलं मुली वेगवेगळ्या विभागात अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील. शिवाय औद्योगिक क्षेत्रात उद्योजक तयार होतील आणि राजकीय क्षेत्रात समाज बांधव नेते मंडळींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील व भविष्यात राजकीय पटलावर परिवर्तन होईल आणि आपल्या समाजातील आमदार खासदार यांची संख्या वाढेल.या साठी समाजातील नेते मंडळी नी एकत्र येऊन आता नाही तर कधीच नाही अशा तत्वावर ठाम राहुन अंतकरणापासुन प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळेल. अशी आशा हटकर समाज महासंघाचे अध्यक्ष व धनगर व तत्सम जमातीचे नेते भिमराव भुसनर पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad