Type Here to Get Search Results !

बाबासाहेबांची इच्छा नसताना स्वीकारला बौद्ध धर्म, रामदास आठवलेंचं वक्तव्य




बाबासाहेबांची इच्छा नसताना स्वीकारला बौद्ध धर्म, रामदास आठवलेंचं वक्तव्य

पालघर प्रतिनिधी - दिनेश आंबेकर

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची गरज नाही'.

नागपूर, 04 ऑक्टोबर : विजयादशमीच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला लाखो आंबेडकर अनुयायी नागपूरकडे दाखल होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता. पण, बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असं वक्तव्य रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा आंबेडकरी अनुयायासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. देशभरातून लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी यासाठी दीक्षाभूमीला गोळा होत आहे. आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना रामदास आठवले यांनी धक्कादायक विधान केलं आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसतांना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. ते आंबेडकर यांचा फोटो वापरतात. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची गरज नाही, असं वक्तव्य आठवले यांनी केलं.तसंच, "पन्नास खोक, एकदम ओके म्हणणारे आहे बोके त्यांना नाही डोके..." कारण गद्दारी ही एकनाथ शिंदे यांनी नाही तर उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे पेक्षा मोठा मेळावा एकनाथ शिंदे यांचा होणार आहे, असा दावाही आठवले यांनी केलारिपब्लिकन पक्षाला राज्य सरकार मध्ये सत्तेचा वाटा मिळायला हवा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांची गरज नाही. कारण भाजप, शिंदे आणि आरपीआय युती मजबूत आहे' असं म्हणत आठवले यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad